Pune Accident: मुळशीच्या रस्त्यावर 5 सेकंदात 70 सायकलींचा खच, पुण्यातील सायकल रॅलीच्या अपघाताचे फोटो समोर

Last Updated:
मुळशीत ताशी ६० ते ७० किमी वेगाने धावणाऱ्या सायकलपटूंना या अरुंद रस्त्याचा आणि तीव्र वळणाचा अंदाज आला नाही.
1/7
 जागतिक स्तरावर पुण्याचे नाव उज्वल करणाऱ्या भव्य सायकलिंग स्पर्धेला अपघाताचे गालबोट लागले आहे. पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर' दरम्यान मुळशी-कोळवण रस्त्यावर अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने सायकलपटूंचा अपघात झाला.

advertisement
2/7
या अपघातात जवळपास 70  हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले असून अनेक जण  जखमी झाले आहेत. या विचित्र अपघातात अनेक सायकलस्वार जखमी झाले असून मोठी खळबळ उडाली आहे.

3/7
मुळशीतील कोळवण रोडवरून सायकलपटू पुढे जात असताना रस्त्याची रुंदी अचानक कमी झाली.  ताशी ६० ते ७० किमी वेगाने धावणाऱ्या सायकलपटूंना या अरुंद रस्त्याचा आणि तीव्र वळणाचा अंदाज आला नाही.

4/7
 आघाडीच्या सायकलपटूचा ताबा सुटल्याने मागून येणारे खेळाडू एकापाठोपाठ एक एकमेकांवर आदळले.अन् क्षणातच एकावर एक सायकलींचा खच पडला.

5/7
 काही जण जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  सायकलींचे अक्षरश: तुकडे झाले आहेत.स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे.

6/7
 सुदैवाने, डोक्याला हेल्मेट असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी अनेक खेळाडूंना या अपघातामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.

7/7
नियोजनाबाबत खेळाडूंमध्ये नाराजी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेत सुरक्षेचे सर्व नियम पाळले जात असल्याचा दावा आयोजकांनी केला होता. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर खेळाडू एकमेकांवर आदळल्याने मार्गावरील नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement