महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी प्रॉपर्टी आहे. सध्या भारतात मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकाता येथे चार ट्रम्प टॉवर आहेत. सध्या भारतात चार ट्रम्प टॉवर आहेत. मुंबई, पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर आहेत. पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात दोन 23 मजली ट्रम्प टॉवर्स आहेत. ही इमारत भारतातील सर्वात महागड्या इमारतींपैकी एक आहे. 'ट्रम्प टॉवर्स' हा रिअल इस्टेट प्रकल्प असून जो पंचशील ग्रुपने बांधला आहे. त्याचे मालक अतुल चोरडिया या प्रकल्पात ट्रम्प यांचे व्यावसायिक भागीदार आहेत.
advertisement
4BHK आणि 5BHK आलिशान फ्लॅट
साडेचार एकर जागेवर ट्रम्प टॉवर्स बांधण्यात आले आहेत. या दोन जोडलेल्या इमारती आहेत. प्रत्येक इमारतीच्या एका मजल्यावर एक फ्लॅट आहेत. ही संपूर्ण इमारत काळ्या काचेने झाकलेली आहे, जी अमेरिकेतून आली आहे. या इमारतीती 4BHK आणि 5BHK आलिशान फ्लॅट आहेत. या इमारतीचे इटालियन इंटेरिअर डिजायनर माटेओ नुन्ज़ियाती यांनी केले आहे.
किती रुपयाला एक फ्लॅट?
या टॉवरमध्ये दोन इमारती आहेत. एक फ्लॅट हा 4800 ते 6000 स्क्वेअर फुटांचा असून त्याची किंमत 15 ते 16 कोटी आहे. प्रत्येक फ्लॅटला आउटडोअर स्विमिंग पूल आहे. तसेच फ्लॅटमध्ये फक्त बायोमेट्रिक कार्डनेच एन्ट्री घेता येते. तसेच सोसायटीत 13,500 स्क्वेअर फीटची आर्ट गॅलरी देखील आहे. ट्रम्पचा हा भारतातील पहिला फ्लॅट होता. या दोन्ही इमारतीत 46 अपार्टमेंट आहेत. बॉलिवूड स्टार हृतिक रोशन, रणबीर कपूर आणि ऋषी कपूर यांनी यामध्ये फ्लॅट घेतले आहेत. काही परदेशी व्यावसायिकांनी महिन्याला चार ते पाच लाख रुपये भाड्याने फ्लॅट घेतले आहेत.
ट्रम्प टॉवर चर्चेत का आले?
रणबीर कपूरचा पुण्यातील ट्रम्प टॉवर्समध्ये फ्लॅट आहे. शीतल तेजवानीने करारात नमूद केलेल्या लॉक-इन कालावधीच्या आधीच घरातून काढून टाकण्यात आल्याबद्दल नुकसानभरपाई आणि त्यावर व्याजाची मागणी केली. हा दावा पुणे दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला असून तेजवानीने 50 लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. या प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्विट केले. त्यामुळे ट्रम्प टॉवर चर्चेत आले होते.
