1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असणाऱ्या वाहनांना परिवहन विभागाने सुरक्षा नंबर प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. 30 जूनपर्यंत या नंबरप्लेट बसवण्याची अंतिम मुदत देण्यात आलीये. परंतु, परिवहन विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना सातत्याने त्रासाला सामोरं जावं लागत आहे. कधी वेबसाईट बंट, तर कधी अचानक केंद्रच बंद अशी स्थिती असून वाहनधारकांना सारख्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यातच नोंदणी केली तरीही वेळेवर नंबरप्लेट येत नसल्याच्या तक्रारींनी नागरिक हैराण झाले आहेत. अशातच आता नवीच समस्या निर्माण झाली आहे.
advertisement
वाहन धारकांसाठी दिलासादायक बातमी, HSRP नंबर प्लेट जागेवर बसवणार, 'ही' आहे अट
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी
गुढीपाडव्याचा मुहूर्तावर अनेकजण वाहन खरेदी करतात. त्यामुळे ग्राहकांच्या सेवेला प्राधान्य देण्यासाठी वाहनांच्या शोरुमचालकांनी थेट सुरक्षा नंबर प्लेट बसविणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे फलकच शोरूमचालकांनी लावले आहेत. त्यामुळे तारीख घेतलेल्या लोकांना नाहक केंद्राच्या चकरा माराव्या लागत आहेत.
केंद्र वाढवण्याच्या सूचना
पुण्यात सुरक्षा नंबरप्लेट बसविण्याचे काम रोझमाटां कंपनीला दिले आहे. आरटीओकडून कंपनीच्या अधिकाऱ्यांना नंबर प्लेट बदलण्यासाठी केंद्रे वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही या केंद्रांची संख्या अद्याप वाढवण्यात आलेली नाही. त्यात 20 ते 31 मार्च दरम्यान नंबरप्लेट बसविली जाणार नाही, असे बोर्ड शोरुमचालकांनी लागवले आहेत. त्यामुळे गैरसोय होत असल्याची तक्रार एका वाहनधारकाने केली.