TRENDING:

IAS Pooja Khedkar : पूजा मॅडमचं ते प्रकरण वडिलांना भोवलं; दिलीप खेडकरांच्या अडचणीत मोठी वाढ!

Last Updated:

वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे आतापर्यंत समोर आले आहेत. या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, वैभव सोनवणे, प्रतिनिधी : वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे आतापर्यंत समोर आले आहेत. ट्रेनी अधिकारी असताना खासगी गाडीला अंबर दिवा तसेच इतर अनेक मागण्यांमुळे पूजा खेडकर या अडचणीत आल्या होत्या. त्यानंतर त्यांचे अनेक कारनामे समोर आले. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन युपीएससीकडून त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली. त्यांची उमेदवारी रद्द करून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपासात देखील धक्कादायक माहिती समोर आली होती. पूजा खेडकर यांनी अनेकदा आपल्या नावात बदल करून युपीएससीची परीक्षा दिल्याचं समोर आलं.
News18
News18
advertisement

दरम्यान या प्रकरणाता आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावे यासाठी दबाव आणल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्या वडिलांवर आहे. आता या प्रकरणात दिलीप खेडकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी तहसीलदार दीपक आकडे यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात अर्ज दिला असून, पोलिसांकडून अर्जाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

यापूर्वी देखील एका प्रकरणात पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. शेतकऱ्यांना धमकी दिल्याचा पूजा खेडकर यांच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मराठी बातम्या/पुणे/
IAS Pooja Khedkar : पूजा मॅडमचं ते प्रकरण वडिलांना भोवलं; दिलीप खेडकरांच्या अडचणीत मोठी वाढ!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल