पिंपरी चिंचवड : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पिंपरी चिंचवडमधून अपंगत्वाचं सर्टिफिकेट मिळालं असल्याचं समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून पूजा खेडकर यांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळालं होतं. डाव्या गुडघा 7 टक्के कायमस्वरूपी आधु असल्याचं या प्रमानपत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. 24 ऑगस्ट 2022 रोजी हे प्रमाणपत्र वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरांना दिलं होतं. सर्टिफिकेट घेण्यासाठी खेडकर यांनी पिंपरी चिंचवड मधील रेशन कार्ड आणि इतर कागदपत्र दाखल केलं होतं. याआधी पूजा खेडकर यांनी कमी दिसत असल्याचं सर्टिफिकेटही दिलं होतं, यातून पूजा खेडकर यांनी युपीएससीमध्ये दिव्यांगांना मिळणारे लाभ घेतले होते.
advertisement
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्राने एक समिती नेमली आहे, त्या समितीने अहवाल मागवला आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त यांच्या पत्रानुसार अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे शासकीय रुग्णालयामध्ये देण्यात आलेले डोळ्याचे दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. तर पाथर्डी आणि शेवगावचे प्रांत यांनी नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र दिले होते. या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती आणि खुलासा घेवून अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बोलवले होते. या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपला अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
नियमबाह्य पद्धतीने वागल्याचा आरोप करत पूजा खेडकर यांची बदली पुण्याहून वाशिमला करण्यात आली आहे. वादांच्या या मालिकांनंतर पूजा खेडकर पहिल्यांदाच समोर आल्या आहेत. समिती मला जे प्रश्न विचारेल त्याची उत्तरं मी त्यांना देईन. समितीचा निर्णय मला मान्य असेल, असं पूजा खेडकर म्हणाल्या आहेत. गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येक जण निदोर्ष हे आपलं संविधान सांगतं. मीडिया ट्रायलमध्ये मला गुन्हेगार दाखवलं जात आहे, हे चुकीचं आहे’, असं म्हणत पूजा खेडकर यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.
