मत्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणेंनी मल्हार सर्टिफिकेटची घोषणा केली आहे. नितेश राणेंनी हिंदू मटण विक्रेत्यांसाठी मल्हार झटका सर्टिफिकेट आणलं. पण त्याला आता जेजुरी ट्रस्टच्या सदस्यांनी आक्षेप नोंदवला आहे. मटणाच्या वेबसाइटला हिंदु देवाचं नाव नको, अशी भूमिका जेजुरी संस्थान ट्रस्टने घेतल्याने नितेश राणेंची हलाल विरोधात मल्हार सर्टिफिकेट मटणाच्या बाजारात उतरवण्याजी ती कृती पुन्हा वादात सापडली आहे.
advertisement
नितेश राणेंनी नेमकी काय केली घोषणा
राज्यातील हिंदू मांस विक्रेत्यांसाठी मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. झटका पद्धतीनं जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या हिंदू मांस विक्रेत्याना हे मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून केवळ हिंदू समाजातील मांस विक्रेत्यांना हे सर्टिफिकेट दिलं जाणार आहे.
मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मांस (Meat) खरेदी करू नका, असे आवाहन देखील नितेश राणे यांनी केले आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून हलाल पद्धतीला एक प्रकारे झटका देण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 'लाल मांस' नियमांमधून 'हलाल' हा शब्द काढून टाकला होता. त्यानंतर हलाल वरून बराच वाद रंगला होता. आता महाराष्ट्रात मल्हार सर्टिफिकेटवरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे.