पूर्वी जाहीर झालेल्या भरतीसाठी एकूण 27,879 उमेदवारांनी अर्ज केले होते. या अर्जांमध्ये काही उमेदवारांची वयोमर्यादा संपल्यामुळे ते पात्र ठरले नव्हते. पण राज्य सरकारने त्यांना पुन्हा अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे यासाठी अर्ज करण्याची संधी या उमेदवारांना मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
याशिवाय उमेदवारांना आपला जाती प्रवर्ग सुधारण्याची संधी देखील देण्यात आली होती. सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्यासाठी प्रशासनाने उमेदवारांना 12 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. या संधीचा लाभ घेण्यासाठी 4,499 उमेदवारांनी अर्ज केले आहेत,असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे. सुरुवातीला ही मुदत 30 ऑगस्टपर्यंत होती. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही मुदत वाढविण्यात आली होती.
advertisement
पुढील आठवड्यात ही नवीन जाहिरात प्रसिद्ध होईल असे प्रशासनाकडून स्पष्ट केले गेले आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण सुविधा उपलब्ध होईल. यासाठी महापालिकेकडून योग्य मार्गदर्शनही केले जाणार आहे.
महापालिकेच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता ठेवणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. उमेदवारांची निवड त्यांच्या पात्रतेनुसार केली जाईल तसेच परीक्षा प्रक्रियेतील कोणत्याही तांत्रिक अडचणी दूर करून भरती वेळेत पूर्ण केली जाईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
शहरातील उमेदवार या भरतीसाठी उत्सुक असून अनेकांनी अर्जासाठी तयारी सुरु केली आहे. प्रशासनाने सांगितले की, अर्ज प्रक्रिया सुरू होताच सर्व उमेदवारांना त्याबाबत ईमेल आणि सूचना पाठवण्यात येतील. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपली माहिती आणि कागदपत्रे योग्यरीत्या तयार ठेवणे गरजेचे आहे.