कसा आहे प्रवास?
सविता कुंभार यांचा विवाह 1992 साली संजय कुंभार यांच्या सोबत झाला. लग्नानंतर 1996 मध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर सविता कुंभार यांनी 2001 पासून व्हॅन चालवायला सुरुवात केली. त्या शाळेत मुलांची ने आण करतात. ‘हा व्यवसाय म्हणजे पुरुषांचा असलेला असा आहे. माझी मुलगी 3 वर्षाची असताना पतीच निधन झालं आणि त्यानंतर आता काय करायचं हा प्रश्न माझ्यासमोर होता.
advertisement
चांद्रयान 3 चं लँडींग कसं झालं? बीडकरांना अनुभवता येणार तो थरार, Video
शिक्षण नववी असल्यामुळे कुठे नोकरी मिळेल की माहिती नव्हती एवढ्या लहान मुलीला घेऊन कुठं जाणार असा प्रश्न होता. माझ्या नवऱ्याची रिक्षा होती ती मी चावायला शिकले. तेव्हा लायसन आणि बॅच काढला तेव्हा आरटीओ वाले म्हणाले तुम्हाला लायसन नाही देणार. पण नंतर त्यांना ते आरटीओ वाल्यानी ते दिलं',असं सविता कुंभार यांनी सांगितलं.
टाकाऊ चहापूड बदलेल तुमचं नशीब, शिवाजी विद्यापीठातील संशोधनाला मिळालं पेटंट
'त्यानंतर मला पुण्यातील पाहिली महिला ड्राइव्हर म्हणून घोषित करण्यात आलं. 2005 मध्ये मला पाहिला पुरस्कार महानगर पालिकेकडून मिळाला आणि ही अशीच कौतुकाची थाप पाठीवर पडत गेली. यशस्वीनी, कर्तुत्वान महिला, रणरागिणी, स्वयंसिद्ध, सन्मान चिन्ह, कृतज्ञता, स्त्री शक्तीचा जागर, लघु उद्योजका, धाडसी महिला उद्योजका असे 65 पुरस्काराने मला मिळाले आहेत. एक व्हॅनपासून सुरुवात केलेली आता 4 व्हॅन माझ्या स्वतःच्या आहेत. तसच इतर सामाजिक संस्थासाठी देखील काम करते. याच माझ्या जीवनावर आधारित तू चाल पुढं... पुस्तकात माझा जीवन प्रवास देखील मी लिहिला आहे. तर महिलांनो, खचून न जाता संघर्ष करून पुढं जायला शिका' असं' व्हॅन चालक सविता कुंभार म्हणतात.





