TRENDING:

Pune Breaking : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरात मोठा उड्डाणपूल होणार तयार; कसा आहे प्लॅन?

Last Updated:

Pune Metro News : पुण्यात मेट्रोच्या कामासाठी चार पदरी पूल पाडण्यात येणार असून त्याच ठिकाणी तीन मजली उड्डाणपूल उभारले जाणार आहे. या पुलांमुळे वाहतूक मार्गात बदल करून मेट्रो मार्गासाठी जागा तयार केली जाईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यात मेट्रोच्या विस्ताराच्या कामांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. रामवाडी ते वाघोली हा मेट्रो मार्ग आणि अहिल्यानगर महामार्ग यांना जोडण्याच्या प्रस्तावाबाबत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी महामेट्रो आणि एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या बैठकीत या प्रकल्पासाठी आवश्यक निधी कसा उभारता येईल. राज्य सरकारकडून किंवा इतर स्रोतांद्वारे निधी मिळवता येईल का यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मेट्रोच्या मंजूर व विस्तारित मार्गाबाबत अंतिम निर्णय मुंबईत आयोजित होणाऱ्या बैठकीत घेण्यात येईल असे पवार यांनी स्पष्ट केले.
News18
News18
advertisement

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महामेट्रो, एमएसआयडीसी आणि एमएसआरडीसी यांचे अधिकारी सहभागी झाले होते. या वेळी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक आवण हडर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड येथील भक्ती-शक्ती चौक ते चाकणपर्यंतच्या मेट्रो मार्गाचे सादरीकरण केले. तसेच रामवाडी ते वाघोली, हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड या विस्तारित मार्गांवर चर्चा झाली.

रामवाडी ते वाघोली मार्गावर दुहेरी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले गेले. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी कसा उभारावा, हा मुद्दा देखील बैठक दरम्यान चर्चेत आला. मेट्रोकडून या मार्गासाठी आर्थिक नियोजन करण्यात आले असून इतर खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि राज्य सरकारकडून मिळवता येईल का यावरही चर्चा झाली. पवारांनी या मार्गावरील कामांचे नियोजन सविस्तर करण्याचे निर्देश दिले. तसेच हडपसर ते लोणी काळभोर व हडपसर ते सासवड मार्गांवर एमएसआरडीसी आणि एनएचएआय यांच्या मदतीने कामे एकत्रितपणे राबवण्याचेही सुचवले.

advertisement

पिंपरी-चिंचवड नागरिकांसाठी मेट्रोच्या सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहेत. पिंपरी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर पिंपरी ते निगडीपर्यंत मार्ग तयार केला जात आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते चाकणपर्यंत मेट्रो मार्ग विस्तारण्याचे काम देखील सुरु आहे, ज्यासाठी डीपीआर तयार केला गेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भक्ती-शक्ती चौक ते चाकण मार्ग तळेगाव दाभाडेपर्यंत विस्तारता येईल का याची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

advertisement

भोसरी येथे मेट्रो प्रकल्पाच्या कामांसाठी विद्यमान चार पदरी पूल पाडावा लागणार असून त्याऐवजी तीन मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर सहा पदरी रस्ता, दुसऱ्या मजल्यावर आठ पदरी रस्ता आणि तिसऱ्या मजल्यावर मेट्रो मार्ग असणार आहे. फुगेवाडी येथील मेट्रो कार्यालयात बैठकीत ही माहिती सांगितली गेली. गणेशोत्सवात मेट्रो सेवांचा लाभ नागरिकांना झाला आणि पुढील टप्प्यात मेट्रो मार्ग चाकणपर्यंत नेला जाणार आहे.

advertisement

पुढील काळात पुण्यात होऊ घातलेल्या विमानतळासाठी तसेच काही ठिकाणी बोगदे निर्माण करण्याबाबत देखील चर्चा झाली. पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी, पीसीएमसी, पीएमसीसह एनएचएआय आणि रस्ते विकास महामंडळ एकत्र येऊन पुढील 100 वर्षांचे नियोजन ठेवून कामे राबवतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार असून नागरिकांना प्रवासात मोठा आराम मिळेल.

advertisement

या प्रकल्पामुळे फक्त मेट्रो सुविधा वाढणार नाही तर शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडीही कमी होईल. नवीन उड्डाणपूल आणि विस्तारित मेट्रो मार्ग यामुळे पिंपरी, भोसरी, हडपसर, वाघोली आणि आसपासच्या भागांमध्ये प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होईल. शहराच्या भविष्यातील विकासासाठी हा मेट्रो प्रकल्प निर्णायक ठरणार आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Breaking : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरात मोठा उड्डाणपूल होणार तयार; कसा आहे प्लॅन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल