बैठकीस महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, ओमप्रकाश दिवटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक योगेश ससाणे तसेच महापालिकेचे विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी केवळ वाहतूक कोंडी नव्हे तर कचरा व्यवस्थापन, अपुरा पाणीपुरवठा, दूषित पाणी आणि अन्य मूलभूत सुविधांबाबत तक्रारी मांडल्या.
advertisement
हडपसर परिसरातील कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ होत आहे, पाणी दूषित होत आहे तसेच बोअरवेलमध्येही दूषित पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार होती. नागरिकांनी महापालिकेवर प्रश्न उपस्थित केला की शहरातील प्रकल्प शहराच्या चारही दिशांना समप्रमाणात वाटप केले असते तर हडपसरवरच का जास्त प्रकल्प देण्यात आले आहेत. रामडेकडी येथे 700 टन क्षमतेचा कचरा प्रकल्प असून तो सुरू नसतानाही येथे कचरा येत आहे आणि तो जतन केला जातो, अशी तक्रारही नोंदवली गेली.
डॉ. कोल्हे यांनी हडपसर आणि इतर भागातील कचरा प्रकल्पांची संख्या आणि शहराच्या इतर भागांतील प्रकल्पांविषयी प्रशासकांना विचारले. मात्र, अधिकारी या प्रश्नांना तातडीने उत्तर देऊ शकले नाहीत. तसेच होर्डिंग आणि फलक सुरक्षा यावर काय उपाययोजना आहेत, असा प्रश्न विचारल्यावर अधिकारी यांनी सर्व्हे करून नंतर होर्डिंग लावण्यात येईल, असे सांगितले. त्यावर महापालिका आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले की फक्त बोर्ड लावणे पुरेसे नाही तर त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे आणि त्याचा अहवाल सादर करावा.
या बैठकीत नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने लक्ष देण्याबाबत विशेष चर्चा झाली असून, विशेषत: वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि परिसरातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले गेले आहे.