पोलिसांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन विसर्जन मिरवणुकीचे नियोजन, कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केली. त्यात म्हटले की, गणेश मंडळांसोबत चर्चेतून सर्व नियम ठरवले असून, पथकांनी त्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. पोलिस निरीक्षणानुसार, पूर्वी प्रत्येक चौकात पथकांना काही मिनिटे स्थिर वादन करायला लागे आणि यामुळे मिरवणूक लांबत असे. यंदा यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. लक्ष्मी रस्ता, बेलबाग बौक, गणपती चौक, कुंटे चौक, गरूड गणपती नौक, टिळक भौक अशा मार्गांवर स्थिर वादन करण्यास मनाई आहे.
advertisement
पोलिसांनी याबाबत सक्त सूचना केली आहे की, मिरवणूक मार्गावर कोणताही वादक डोल घेऊन उलट दिशेने येणार नाही. पूर्वीच्या अनुभवातून असे लक्षात आले आहे की, काही पथक उलट दिशेने येत असताना मिरवणुकीतील अन्य मंडळांना, वादकांना आणि नागरिकांना अडथळा निर्माण होत असे. यामुळे मिरवणूक सुरळीत पार पाडणे कठीण झाले होते. यंदा पोलिसांनी मार्गदर्शनानुसार सर्व पथक मार्गावर पुढे जाण्याची व्यवस्था केली आहे आणि नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई होईल, असे स्पष्ट केले आहे.
यंदाच्या विसर्जनासाठी एका मंडळाला फक्त दोन पथक लावता येतील. एका पथकात वादक आणि सहाय्यक मिळून 60 जणांचा समावेश असेल. तसेच, प्रत्येक मंडळाला ढोल-ताशा पथक किंवा ध्वनिक्षेपक यापैकी केवळ एकाचाचा समावेश करता येईल. अमितेशकुमार यांनी सांगितले की, या नियमांमुळे मिरवणूक सुव्यवस्थित आणि सुरक्षित होईल.
अशा प्रकारे यंदा पुणे पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत स्थिर वादन बंदी, उलट मार्गावरील मिरवणूक मनाई आणि पथकांची मर्यादा यांसारखी नियमावली ठरवली आहे. यामुळे नागरिकांना अडथळा न येता, मंडळांना सुव्यवस्थित मार्ग मिळेल आणि मिरवणूक आनंददायी तसेच सुरक्षीतपणे पार पडेल.