TRENDING:

Police Bharti : तयारीला लागा! पुणे पोलीस दलात मोठी भरती होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Last Updated:

Pune Police Bharti 2025: पुणे पोलीस दलात होणारी ही सर्वात मोठी भरती आहे. नवीन गावांचा समावेश झाल्यानंतर गृह विभागाने मंजुरी दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे पोलिस दलात लवकरच नवीन मोठी भरती होणार आहे. नवीन गावांचा समावेश झाल्यानंतर गृह विभागाने यासाठी मंजुरी दिली आहे. ही पावले नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाची आहेत. पुणे शहराची भौगोलिक सीमा वाढल्यामुळे पोलीस दलावर कामाचा ताण अधिक वाढला आहे. सध्या सुमारे 70 लाख लोकसंख्येसाठी साडेआठ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ज्यामुळे गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर ताण वाढत आहे.
News18
News18
advertisement

लवकर भरती सुरु

पुणे पोलिसांनी आता आपली क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती लवकरच 1,720 पदांच्या भरण्याचा शिक्का मोर्तब करणार आहे. ही पुणे पोलीस दलातील मागील काही वर्षांतील सर्वात मोठी भरती ठरणार आहे. नवीन भरतीसह कायद्याचे काटेकोर पालन आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.

advertisement

नवीन पोलिस स्टेशनची उभारणी

यासाठी पाच नवीन पोलीस ठाण्यांना गृह विभागाने मंजुरी दिली आहे. यामध्ये मांजरी, लोहगाव, येवलेवाडी, नऱ्हे आणि लक्ष्मीनगर ठाण्यांचा समावेश आहे. या ठाण्यांची स्थापना विद्यमान ठाण्यांपासून विभाजन करून केली जाणार आहे. उदाहरणार्थ कोंढावा पोलीस ठाण्यापासून येवलेवाडी पोलीस ठाणे, सिंहगड पोलीस ठाण्यापासून नऱ्हे पोलीस ठाणे, येरवडा पोलीस ठाण्यापासून लक्ष्मीनगर पोलीस ठाणे, विमानतळ पोलिस ठाण्यापासून लोहगाव पोलीस ठाणे आणि हडपसर पोलिस ठाण्यापासून मांजरी पोलीस ठाणे स्थापन होणार आहेत.

advertisement

या भरतीत 830 नवीन पदांची निर्मिती होणार आहे तर उर्वरित पदे विद्यमान रिक्त जागांमधून भरली जातील. तसेच दोन नवीन परिमंडळांसाठीही मान्यता मिळाली आहे. यामध्ये दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त, पाच वरिष्ठ निरीक्षक, पाच निरीक्षक आणि विविध स्तरांवरील अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली जाणार आहे. मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिल्यानंतर, उच्चाधिकार समिती लवकरच शिक्का मोर्तब करून अंतिम मान्यता देण्याची शक्यता आहे.

advertisement

या भरतीमुळे पुणे पोलीस दलाची क्षमता मजबूत होईल, शहरातील गुन्हेगारी कमी होईल, वाहतूक व्यवस्थापन सुधारेल आणि नागरिकांची सुरक्षा अधिक खात्रीशीर होईल. नवीन पोलीस ठाण्यांच्या स्थापनेमुळे नागरिकांच्या जवळ पोलीस अधिक पोहोचतील, तसेच आपत्कालीन परिस्थितींमध्ये तत्पर प्रतिसाद मिळेल. या सर्व बदलांमुळे पुणे शहरातील पोलिस व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि आधुनिक होईल.

मराठी बातम्या/पुणे/
Police Bharti : तयारीला लागा! पुणे पोलीस दलात मोठी भरती होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल