TRENDING:

लोणावळ्यात 'डेथ मिस्ट्री'! ऑफिसला गेलेल्या तरुणाचा 700 फूट खाली दरीत मृतदेह, मृत्यूचं गूढ वाढलं

Last Updated:

परेश हटकर हे बुधवारी घरातून ऑफिसला जाण्यासाठी निघाले होते. मात्र ते कामावर पोहोचलेच नाहीत. दरम्यान, लोणावळ्यातील लायन्स पॉईंट येथे त्यांची कार कालपासून बेवारस उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मावळ, (गणेश दुडम, प्रतिनिधी): लोणावळ्यातील पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लायन्स पॉईंट परिसरातील खोल दरीत एका ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. परेश हटकर असे या मृत व्यक्तीचे नाव असून, ते 'ऑफिसला जातो' असे सांगून घराबाहेर पडले होते. ही घटना घातपात आहे की अपघात, याचा शोध आता लोणावळा ग्रामीण पोलीस घेत आहेत.
दरीत आढळला  मृतदेह
दरीत आढळला मृतदेह
advertisement

नेमकी घटना काय?

परेश हटकर हे बुधवारी घरातून ऑफिसला जाण्यासाठी निघाले होते. मात्र ते कामावर पोहोचलेच नाहीत. दरम्यान, लोणावळ्यातील लायन्स पॉईंट येथे त्यांची कार कालपासून बेवारस उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पाटील संतोष मरगळे यांनी यासंदर्भात माहिती दिल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली.

परेश यांचा मोबाईल फोन लायन्स पॉईंटवरच सापडला होता, मात्र विशेष म्हणजे त्यांचे टॉवर लोकेशन 'पाली' किंवा 'इमॅजिका' परिसरात दाखवत होते. लोणावळ्यातील दरीच्या भौगोलिक परिस्थितीमुळे अनेकदा लोकेशनमध्ये असा तांत्रिक फरक पडतो, हे ओळखून 'शिवदुर्ग बचाव पथकाने' दरीत शोध घेण्याचा निर्णय घेतला.

advertisement

७०० फूट खोल दरीत शोधमोहीम: ज्या ठिकाणी मोबाईल सापडला, त्याच ठिकाणाहून शिवदुर्ग पथकाचे सदस्य रोपच्या साहाय्याने सुमारे ७०० फूट खोल दरीत उतरले. प्रचंड कष्टानंतर बचाव पथकाला परेश यांचा मृतदेह सापडला. श्रुती शिंदे, योगेश उंबरे आणि सचिन गायकवाड यांनी दरीत उतरून मृतदेह सुरक्षितपणे पॅक केला. सुमारे चार तासांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
काळ्या मातीची काळजी घ्या! PH असा राखा संतुलन, उत्पन्न वाढण्यास होईल मदत
सर्व पहा

अपघात की घातपात? : परेश हटकर दरीत पडले कसे? त्यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत काही घातपात झाला? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या/पुणे/
लोणावळ्यात 'डेथ मिस्ट्री'! ऑफिसला गेलेल्या तरुणाचा 700 फूट खाली दरीत मृतदेह, मृत्यूचं गूढ वाढलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल