या लिलावात दुचाकी, चारचाकी, ट्रक, मिनीबस, बस आणि स्लीपर बस यासह विविध प्रकारची वाहने आहेत. लिलाव टप्प्याटप्प्याने होणार असून वाहनधारक, चालक किंवा वाहनाशी संबंधित इतर व्यक्तींना लिलावाच्या आधी दंड भरून किंवा हक्क दाखवून ही वाहने ताब्यात घेता येऊ शकतात. लिलावानंतर कोणतीही मागणी किंवा हरकत स्वीकारली जाणार नाही असे आरटीओने स्पष्ट केले आहे.
advertisement
वाहनधारकांना दंड भरून वाहने ताब्यात घेण्यासाठी पूर्वीच मुदत देण्यात आली होती. मात्र, काही वाहनधारकांनी वाहनं सोडवण्यास टाळाटाळ केली म्हणून आता ई-लिलावाचा निर्णय झाला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी ही माहिती दिली आहे.
पुणे RTO च्या ई-लिलावाची तारीख 15 ऑक्टोबर असून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे असणार आहे. वाहन पाहण्याची मुदत 6 ते 13 ऑक्टोबर हडपसर, शेवाळवाडी आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे आहे. सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी http://www.eauction.gov.in वर करावी लागेल. दुचाकीसाठी 10,000 आणि ट्रक/बससाठी 50,000 रुपये डिमांड ड्राफ्ट अनामत रक्कम आवश्यक तसेच डीएससी बंधनकारक आहे.
हा लिलाव सर्व वाहनप्रेमी, सेकंड हँड वाहन खरेदी करणार्यांसाठी मोठी संधी आहे. या लिलावात सहभागी होऊन स्वस्त दरात वाहन खरेदी करता येईल. वाहन जप्त केलेली असल्यामुळे ही वाहनं किंचित कमी किंमतीत मिळू शकतात. इच्छुकांनी वेळेत नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी. तसेच अनामत रक्कम देऊन लिलावात बोली लावावी.
या लिलावामुळे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना शिक्षा होईल आणि योग्य व्यक्तींना वाहन मिळण्याची संधी मिळेल. त्यामुळे लिलावामध्ये सहभागी होण्यापूर्वी सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण लिलाव ऑनलाइन पार पाडला जाईल, त्यामुळे इच्छुकांना खाजगी किंवा ऑफलाइन प्रक्रियेची गरज नाही.