मुंबई शहर आणि उपनगरात 14 मार्चला निरभ्र आकाश असू शकतं. मुंबईतील तापमानात 14 मार्च रोजी काहीशी घट होऊन तेथील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत मुंबईतील तापमानात आणखी घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
तरुणाने सुरू केला अनोखा व्यवसाय, आज महिन्याला करतोय 1 लाखांची उलाढाल, असं काय केलं?
advertisement
14 मार्च रोजी पुण्यातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. पुढील 24 तासांत पुण्यातील तापमानात अंशतः घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 मार्च रोजी निरभ्र आकाश असू शकतं. तेथील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात अंशतः वाढ झालेली दिसून येत आहे. तर पुढील 2 दिवसांत तापमानात काहीशी घट होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
14 मार्च रोजी उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके इतकं असू शकतं. त्याठिकाणी निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. नाशिकमधील तापमानात अंशतः घट बघायला मिळत आहे. पुढील 2 दिवसांत नाशिकमधील तापमानात आणखी घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूर मध्ये 14 मार्च रोजी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. तेथील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात काहीशी घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. विदर्भातील अकोला अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून 14 मार्चसाठी उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
राज्यातील तापमानात सतत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पुढील 2 दिवसांत राज्यातील तापमानात काहीशी घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्याने तेथील नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.





