मुंबई शहर आणि उपनगर बरोबरच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना 11 मार्चसाठी हिट वेव्हचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार असून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर पुण्यामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमध्ये दुपारनंतर ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे असेल.
advertisement
उन्हाच्या तडाख्याचा प्राण्यांना त्रास, कशी राखाल निगा? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यातील प्रमुख शहर छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा हा 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्याबरोबर उत्तर महाराष्ट्र देखील तापणार आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये सकाळच्या वेळी काही सहज धुके राहण्याची शक्यता आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधील कमाल तापमान हे सातत्याने वाढत असून ते 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.