TRENDING:

Weather Alert : उष्णतेच्या लाटेत पुन्हा अवकाळीचं संकट, या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान विभागाने दिला अलर्ट

Last Updated:

एप्रिल महिन्याच्या अखेरीस राज्यातील तापमानात चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर आता 25 एप्रिलला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : एप्रिल महिन्याच्या अखेरीस राज्यातील तापमानात चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील काही शहरांचा समावेश असल्याची सुद्धा माहिती मिळाली होती. गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमान हे 41 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत दरम्यान असल्याने नागरिकांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर 25 एप्रिल रोजी सायंकाळच्या वेळी राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याचे देखील हवामान विभागाने सांगितलेय. 25 एप्रिल रोजी राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल जाणून घेऊयात.
advertisement

जळगाव, जालना, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत 25 एप्रिलला उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता आहे. सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांना 25 एप्रिल साठी हीट वेव्हचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव या ठिकाणी 25 एप्रिलला संध्याकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

advertisement

मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी 25 एप्रिलला मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते. 25 एप्रिलला पुण्यातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते.

advertisement

छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 25 एप्रिलला त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते. नाशिकमधील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते.

नागपूरमधील कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूर मध्ये हीट वेव्ह कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

एकंदरीत राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती बघता असे लक्षात येते की, राज्यात संमिश्र वातावरण तयार होत आहे. त्याचबरोबर उन्हाचा कडाका जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. दुपारच्या वेळी उन्हात बाहेर पडणे टाळावे, असे वारंवार आरोग्य विभागाकडून नागरिकांना सांगण्यात येत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Weather Alert : उष्णतेच्या लाटेत पुन्हा अवकाळीचं संकट, या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान विभागाने दिला अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल