जालना : संपूर्ण राज्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी तीव्र उष्णता जाणवत आहे. त्याचबरोबर कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरातील कमाल तापमान हे 35 ते 36 पर्यंत वाढले आहे. पुढील काही दिवस राज्यातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिकच राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
मागील दोन दिवसापासून मुंबई शहर आणि उपनगरांमधील कमाल आणि किमान तापमान वेगाने वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासांमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे तर आकाश सामान्यतः निरभ्र राहणार आहे.
साखरपुड्यावरही पैसे उधळणाऱ्यांनो, हे पाहाच! शितलने लग्नाचे 3 लाख दिले मंगलकार्यालयाला, कारण...
पुणे शहरामध्ये देखील कमाल तापमान वाढल्याचे पाहायला मिळत असून तापमानाचा पारा हा 35 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. पुणे शहरामध्ये सकाळच्या वेळी काहीसे धूके असेल तर त्यानंतर आकाश निरभ्र होईल. तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढे राहील.
मराठवाड्यातील कमाल तापमानाचा पारा देखील वाढला असल्याचे पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 फेब्रुवारी रोजी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे तर आकाश सामान्य राहण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यातील तुलनेत नाशिकमधील कमाल आणि किमान तापमान कमी आहे. मात्र नाशिकमधील कमाल तापमानामध्ये मागील काही दिवसांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळतंय. 9 फेब्रुवारी रोजी नाशिकमधील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढे राहील.
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमधील कमाल तापमानामध्ये काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये एकूण 24 तासांमध्ये कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्यातील सर्व प्रमुख शहरांमधील कमाल तापमानामध्ये वाढ झाली असून उन्हाळ्याप्रमाणे उष्णता जाणवत असल्याचे पाहायला मिळते. तर सकाळच्या वेळी हलका गारवा देखील जाणवत आहे.





