मुंबई : राज्यातील तापमानात सातत्याने बदल होत आहेत. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसात राज्यातील विविध भागांत ढगाळ वातावरण असल्याचे देखील बघायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तुरळक जिल्ह्यांत पुढील 2 दिवसांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय.
22 फेब्रुवारीला राज्यात सर्वत्र कोरडे वातावरण राहून स्वच्छ सूर्यप्रकाश असेल. मुंबई शहर आणि उपनगरात 22 फेब्रुवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. मुंबईतील तापमानात झालेली वाढ अजूनही कायम आहे. त्यामुळे मुंबईकरांना चांगलाच उकाडा सहन करावा लागत आहे.
advertisement
पुण्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. 22 फेब्रुवारीला पुण्यामध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस पुण्यातील तापमान स्थिर असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे पुणेकरांना सातत्याने उकाडा जाणवत आहे.
जेवणावरनं व्हायची नवऱ्यासोबत भांडणं, बायको वैतागली अन् घेतला निर्णय, आता पैसाच पैसा!
छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात पुढील काही दिवसांत वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 फेब्रुवारीला अंशतः ढगाळ आकाश असू शकतं. तेथील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये 22 फेब्रुवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. नाशिकमधील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये पुढील दोन दिवसांत ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तेथील तापमानात देखील वाढ होणार आहे.
नागपूरमधील तापमानात चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. 22 फेब्रुवारीला नागपूरमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये अंशतः ढगाळ आकाश राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राज्यातील वातावरणात बदल घडून आले आहेत. नागपूरमधील तापमानात बहुतांश वाढ झाली आहे. तर विविध ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे देखील बघायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमान 38 अंश पार गेले आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चांगलाच त्रास होत आहे. वाढते तापमान आणि ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.





