जालना : राज्यात उष्णता कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. 27 फेब्रुवारी रोजी संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट होती. तर 28 फेब्रुवारी रोजीसाठी केवळ ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील कमाल तापमान कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईमध्ये आज 38.7 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. पाहुयात 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व प्रमुख शहरातील कमाल आणि किमान तापमानाची स्थिती कशी असेल.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर कमाल तापमान 36 अंश सेल्सियस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. पुणे शहरामध्ये ही निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढे राहील. कोल्हापूरमध्ये दुपारनंतर ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे.
पचनसंस्थेवर परिणाम अन् वजन वाढण्याचा धोका, पाहा अती चहा सेवनाचे आणखी तोटे Video
तर मराठवाड्यातही कमाल तापमान वाढत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे राहील. उत्तर महाराष्ट्रातही उन्हाचा कडाका वाढायला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे. तर उपराजधानी नागपूरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. कमाल तापमान 36 अंश सेल्सियस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे.
एकंदरीत मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबई आणि कोकण विभागामध्ये उष्णतेची लाट असल्याचे पाहायला मिळालं आता मात्र कोकण विभागात कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.