मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील तर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे असेल. मुंबईमध्ये 12 मार्च रोजी 38 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. 13 मार्च रोजी 2 अंशांनी कमाल तापमान कमी होणार असून यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तर पुण्यामध्ये ही कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
advertisement
Holi 2025: आता संकटं होतील दूर, आयुष्यात येईल सुखाचे रंग, होळीला करा हे उपाय
13 मार्च रोजी पुण्यातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे असेल. कोल्हापूरमध्ये ही तापमानाचा पारा हा सातत्याने वाढत आहे. कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे.
एवढे दिवस मराठवाड्यावर मेहरबान असणारे सूर्यदेव आता पुन्हा एकदा आग ओकायला सुरुवात करत आहेत. मराठवाड्यातील तापमानातही सातत्याने वाढ होत असून संभाजीनगरमध्ये 12 मार्च रोजी 37 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर 13 मार्च रोजी संभाजीनगरतील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे.
तर राज्यात सर्वाधिक 39 अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नाशिक आणि नागपूरमध्ये नोंदवले गेले. नागपूरमध्ये 13 मार्च रोजी देखील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे असेल. तर नागपूरमध्ये मात्र यावर्षीचे सर्वाधिक कमाल तापमान 13 मार्च रोजी पहायला मिळण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार असून किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असेल.





