TRENDING:

Weather alert : सुट्टीचा प्लॅन रद्द करा! 11 मे रोजी महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

Last Updated:

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 11 मे रोजी, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता 11 मे रोजी सुद्धा राज्यात अनेक भागांत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील विविध भागांत सायंकाळच्या वेळी पाऊस आणि दुपारच्या वेळी उन्हाचा पारा असल्याने दमट वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर उकाडा सुद्धा वाढलाय.
advertisement

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान चांगलेच वाढले होते. मात्र, अचानक बदललेल्या वातावरणामुळे आता काही भागांमध्ये उष्णतेचा जोर कमी झाल्याचं जाणवत आहे. तापमानात घसरण झाल्यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला असला तरीही वाऱ्याचा वेग आणि विजांचा कडकडाट मात्र काळजीचं कारण ठरत आहे.

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! मे महिन्यात लावा वांग्याचे 'हे' वाण; फक्त 60 दिवसांत कराल लाखोंची कमाई

advertisement

हवामान विभागाने राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ या 18 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचा जोर आणि विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमान सध्या 31 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचे दिसून येत आहे.

advertisement

राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाचा जोर अधिक असू शकतो. दुपारनंतर व संध्याकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विजांचा कडकडाट होत असताना उघड्यावर थांबू नका. झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ उभे राहण्याचे टाळा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
सर्व पहा

शेतीकाम करत असताना हवामान विभागाच्या सूचना लक्षात घ्या आणि त्याचबरोबर गरज असल्यास सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Weather alert : सुट्टीचा प्लॅन रद्द करा! 11 मे रोजी महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल