काय म्हणाले अजित पवार?
आज मी माझ्या नवीन घराचा गृहप्रवेश केला, असं म्हणत सुरज चव्हाण याने व्हिडीओ शेअर केला. त्यावर अजित पवार यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. सुरज, नवीन घरासाठी आणि भावी आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा, असं अजित पवार सुरज चव्हाणच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाले आहेत.
सुरज चव्हाणचं आलिशान घर
सुरज चव्हाणने देखील अजित पवार यांचे आभार मानले आहेत. सुरज चव्हाणच्या घरातील मोठ्ठा हॉल, त्यालगत मॉड्युलर किचन, प्रशस्त मोकळी जागा आणि हायटेक फ्लोरिंग पाहून अनेकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं आहे. मोठ्या खिडक्या, चकचकीत काचा आणि हाय सीलिंग असल्याने संपूर्ण बंगला अधिक आलिशान दिसतोय. तसेच प्रशस्त खोल्या अन् मोठं अंगण देखील असल्याने सुरजच्या चेहऱ्यावरचं तेज अधिक प्रखरतेने दिसून येत आहे.
सुरज चव्हाणचा प्रवास
दरम्यान, एक साधा रीलस्टार ते बीग बॉसचा विजेता असा प्रवास सुरज चव्हाणचा राहिलाय. बिग बॉसचं विजेतेपद हे त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरलं. तरी देखील त्याच्याकडे स्वतःचं घर नव्हतं. अखेर वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्याचं स्वप्न पूर्ण झालं. या काळात सुरजला अनेकांनी मदत देखील केली.
