TRENDING:

मोठी बातमी: पुण्यातील शनिवारवाड्याजवळ भीषण आग, अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल

Last Updated:

Pune Shaniwarwada Fire News: पुण्याचं वैभव आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या शनिवारवाडा परिसरात आज दुपारी अचानक भीषण आग लागली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Shaniwarwada Fire News: पुण्याचं वैभव आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या शनिवारवाडा परिसरात आज दुपारी अचानक भीषण आग लागली. आगीच्या या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली. शनिवारवाड्याच्या मुख्य गेटजवळ साठलेला कचरा आणि वाळलेल्या लाकडांनी पेट घेतल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
News18
News18
advertisement

नेमकी घटना काय?

आज दुपारी साडे बाराच्या सुमारास शनिवारवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अचानक आग लागली. गेटच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळलेली लाकडं आणि पालापाचोळा साठलेला होता. या कचऱ्याने अचानक पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता ही आग ४० ते ५० मीटर अंतरापर्यंत पसरली, ज्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.

advertisement

अग्निशमन दलाची तातडीची कारवाई

आगीची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. ऐतिहासिक वास्तू असलेल्या शनिवारवाड्याजवळ अशाप्रकारे आग लागल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली होती, मात्र वेळेत मदत पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

आगीचे कारण काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या शेतात लावलं 'पैशाचं पीक', 3 वर्षे नो टेन्शन, फक्त तोडायचं अन् विकायचं, कमाई किती? Video
सर्व पहा

आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र, सध्या पुण्यात तापमान वाढलेले असून कडाक्याचे ऊन पडत आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे वाळलेला कचरा आणि लाकडांनी पेट घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या आग विझवण्याचं काम सुरू आहे. तसेच आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
मोठी बातमी: पुण्यातील शनिवारवाड्याजवळ भीषण आग, अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल