TRENDING:

MHADA Home : म्हाडाची मोठी घोषणा! शिल्लक घरांसाठी बंपर लॉटरी; कुठे अन् कधी अर्ज करायचा?वाचा

Last Updated:

MHADA Tardeo Flats Sold On First Come First : मुंबई शहरातील या महत्त्वाच्या ठिकाणी महागडी घरे आता लॉटरीशिवाय मिळणार आहेत. मात्र या साठी अर्ज कुठे आणि कसा करायचा एकदा जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तुम्हीही मुंबई शहरात हक्काच्या घराचे स्वप्न पाहात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी. मुंबईतील म्हाडाच्या ताडदेव येथील महागड्या घरांची विक्री अखेर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे.
News18
News18
advertisement

दोन वेळा लॉटरीत समाविष्ट करूनही विक्री न झालेल्या या घरांना अखेर खरेदीदार मिळावा यासाठी म्हाडाने नवा निर्णय घेतला आहे. या सात घरांची किंमत सुमारे सहा ते सात कोटी रुपयांपर्यंत आहे. लॉटरीत प्रतिसाद न मिळाल्याने म्हाडाने थेट खुल्या विक्रीचा मार्ग स्वीकारला असून इच्छुकांना आता कोणत्याही अतिरिक्त कागदोपत्री प्रक्रियेविना थेट किंमत भरून घर घेता येणार आहे.

advertisement

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन

लवकरच या घरांसाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध होणार असून अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. त्यासाठी ठराविक तारीख आणि वेळ जाहीर करण्यात येणार आहे. सर्वात आधी अर्ज करणाऱ्याला घर मिळेल अशी प्रणाली म्हाडा राबवणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या घरांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही

advertisement

गृहनिर्माण धोरणानुसार खासगी बांधकाम व्यावसायिकांनी प्रकल्प बांधताना काही घरे म्हाडाला देणे आवश्यक असते. त्याच अटीअंतर्गत, 2022-23 या आर्थिक वर्षात ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमधील आठ घरे एका विकसकाकडून म्हाडाला मिळाली होती. दोनदा लॉटरी काढूनही या घरांची विक्री न झाल्याने म्हाडाने ती अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सेवा निवासस्थान म्हणून वापरण्याचाही विचार केला होता. मात्र, तोही प्रस्ताव पुढे गेला नाही. अखेर, लॉटरीऐवजी फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह पद्धतीने विक्री करण्याला म्हाडा प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे.

advertisement

या घरांचा वापर न झाल्यामुळे म्हाडाला दर महिन्याला दीड ते दोन लाख रुपये दुरुस्ती आणि देखभालीसाठी खर्च करावे लागत आहेत. आतापर्यंत हा खर्च लॉटरीत निवड झालेल्या खरेदीदारावर टाकण्यात येत होता. परंतु, आता म्हाडाने स्वतःच सर्व शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खरेदीदाराला कोणताही अतिरिक्त खर्च न करता घराच्या मूळ किंमतीतच व्यवहार करता येईल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
यंदा 6 की 7 ऑक्टोबर कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? पूजा विधी आणि संपूर्ण माहिती
सर्व पहा

म्हाडाच्या मते ताडदेवसारख्या महागड्या भागातील घरांसाठी खरेदीदारांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी आणि योग्य खरेदीदारांना संधी देण्यासाठी ही नवी पद्धत राबवली जाणार आहे. येत्या काही दिवसांत म्हाडा या संदर्भातील अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करणार असून इच्छुक नागरिकांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जाईल. या नव्या निर्णयामुळे बराच काळ रिकामी पडलेली ताडदेवमधील घरे अखेर विकली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठी बातम्या/पुणे/
MHADA Home : म्हाडाची मोठी घोषणा! शिल्लक घरांसाठी बंपर लॉटरी; कुठे अन् कधी अर्ज करायचा?वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल