अनिस पटेल हे आपल्या स्विफ्ट डिझायर कारने मुंबईहून पुण्याकडे येत असताना, समोरून येणाऱ्या इर्टिगा कारने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पटेल यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर मागून येणारी टाटा नेक्सॉन कारही या भीषण अपघातात अडकली.
१० वर्षीय आमिनाचा मृत्यू: या अपघातात इर्टिगा कारमधील आमिना साजीद मालदार (वय १०) हिचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. तसेच दोन्ही गाड्यांमधील अनिस पटेल, संकेत कोळेकर, आकाश कांगणे आणि मालदार कुटुंबातील चार सदस्य असे एकूण सात जण जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. याप्रकरणी इर्टिगा चालक साजीद मालदार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
रुग्णवाहिकेचा खोळंबा, पोलिसांची तत्परता: अपघातानंतरचा पहिला एक तास हा गोल्डन अवर जखमींचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, तब्बल ३५ मिनिटे संपर्क करूनही १०८ रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही. जखमी रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर मदतीसाठी ताटकळत होते. अखेर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी वेळ न घालवता, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस वाहनांतूनच जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
