TRENDING:

Upwas Food In Pune : खवय्यांसाठी पुण्यातील हॉटस्पॉट; नवरात्रीत येथे होते उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी तुफान गर्दी

Last Updated:

Pune Food Spots : नवरात्रीच्या दिवसात पुण्यातील काही ठिकाणी उपवासाचे पारंपरिक पदार्थ खूप चांगल्या प्रकारे मिळतात.एकदा तरी या ठिकाणी भेट द्या आणि खास नवरात्रीचे चवी अनुभवायला विसरू नका.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : नवरात्रीच्या दिवसात पुणेकरांसाठी उपवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी शहरातील काही खास हॉटेलनी उपवासासाठी खास थाळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. पुण्यातील खवय्यांसाठी ही उत्तम संधी आहे की ते नवरात्रीच्या दिवशी स्वादिष्ट आणि पौष्टिक उपवासाचा आस्वाद घेऊ शकतात. या हॉटेलांमध्ये उपवासासाठी तयार केलेल्या थाळ्या फक्त साध्या पदार्थांचा समावेश करत नाहीत, तर त्यात पारंपरिक चवीची जोपासनाही केली जाते.
News18
News18
advertisement

चला तर जाणून घ्या प्रसिद्ध ठिकाण

पुण्याच्या आपटे रोडवरील श्रेयस हॉटेल हा पुणेकरांचा आवडता ठिकाण आहे. दर रविवारी तसेच नवरात्रीच्या काळात या हॉटेलसमोर लोकांची लांब रांगा लागतात. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये नवरात्रीच्या दिवशी उपवासाची खास थाळी उपलब्ध होते. या थाळीत साबुदाणा खिचडी, बटाट्याची भजी, आमटी, राजगीरा पुरी, पापड आणि सोबत गोड पदार्थ दिले जातात. उपवासाच्या काळात पारंपरिक पदार्थांची ही थाळी पुणेकरांना एकदम खमंग आणि घरगुती चवीची आठवण देते.

advertisement

हॉटेल अभिजात, नारायण पेठ येथेही उपवासाच्या थाळीसाठी विशेष तयारी केली जाते. नारायण पेठेतील अभिजात हॉटेलमध्ये उपवासासाठी विशेषतहा आमटी, बटाट्याची भजी, साबुदाणा खिचडी, राजगीरा पुरी, पापड, गोड पदार्थ आणि केळीचं शिखरण यांचा समावेश असलेली थाळी मिळते. या हॉटेलमध्ये पदार्थ पारंपरिक पद्धतीने बनवले जातात आणि प्रत्येक पदार्थाची चव नैसर्गिक आणि ताजगीने परिपूर्ण असते.

advertisement

पुण्यातील वाडेश्वर हॉटेल हे हॉटेल उपवासासाठी प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या काळात येथे उपवासाची थाळी खास उपलब्ध केली जाते. उपवासाच्या दिवशी म्हणजेच चतुर्थी किंवा नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी अनेक पुणेकर उपवासासाठी वाडेश्वरच्या थाळीचा आस्वाद घेण्यासाठी येतात. या हॉटेलच्या थाळीमध्ये पारंपरिक आमटी, भजी, खिचडी, पुरी, पापड आणि गोड पदार्थांचा समावेश असतो, ज्यामुळे उपवास करतानाही लोकांना स्वादिष्ट आणि तृप्त करणारा अनुभव मिळतो.

advertisement

पुण्यातील सदाशिव पेठेतील गणेश भेळमध्ये थाळी उपलब्ध नसली तरी उपवासासाठी वेगळ्या प्रकारची मिसळ आणि भेळ मिळते. या उपवासाच्या भेळीत विविध प्रकारचे पापड, थोडी खिचडी, गोड-तिखट चिवडा आणि दही यांचा समावेश केला जातो. ह्या मिश्रणावर गरम आमटी ओतली जाते आणि उपवासासाठी खास मिसळ तयार होते. भेळ आणि मिसळ दोन्हीही चविष्ट, पौष्टिक आणि पारंपरिक चवीने भरपूर असतात.

advertisement

एकूणच पुण्यातील हे हॉटेल उपवासाच्या काळात पारंपरिक पदार्थांचे वैविध्य, पौष्टिकता आणि स्वाद मिळवून देतात. घरच्या घरी उपवास करण्याची सोय नसलेल्यांसाठी किंवा व्यस्त जीवनशैलीमुळे वेळ न मिळणाऱ्यांसाठी ही थाळी एकदम योग्य पर्याय आहे. उपवासाच्या थाळ्यांमध्ये पारंपरिक चवीसह आधुनिक तयारीचा समावेश असून प्रत्येक पदार्थ नैसर्गिक घटकांनी बनवला जातो, ज्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण मिळते. पुणेकरांसाठी हे हॉटेल्स नवरात्रीत उपवास करण्याचा अनुभव अधिक सोपा, स्वादिष्ट आणि आनंददायक बनवतात.

नवरात्रीत पुण्यात उपवास करणाऱ्यांसाठी ही हॉटेल्स खरे वरदान आहेत. श्रेयस हॉटेल, अभिजात नारायण पेठ, वाडेश्वर हॉटेल आणि गणेश भेळ या ठिकाणी उपवासाची थाळी मिळवून पुणेकरांना पारंपरिक चवीचा अनुभव घरच्या बाहेर मिळतो आणि त्याचबरोबर उत्सवाच्या आनंदाचा भागही बनतो.

मराठी बातम्या/पुणे/
Upwas Food In Pune : खवय्यांसाठी पुण्यातील हॉटस्पॉट; नवरात्रीत येथे होते उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी तुफान गर्दी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल