TRENDING:

Pawar : मराठा आरक्षणाविषयी भूमिका कधी स्पष्ट करणार? अजितदादांनी सांगितलं तारीख अन् ठिकाण

Last Updated:

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, 25 नोव्हेंबर (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. तर या मागणीला ओबीसी नेते आणि अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. यावरुन मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या शाब्दिक युद्धही पाहायला मिळाला. यावर अद्याप अजित पवार गटाने भूमिका स्पष्ट केली नाही. दरम्यान, अजित पवार यांना याबद्दल विचारले असता त्यांनी पक्षाच्या शिबिरात यावर भूमिका मांडणार असल्याचे सांगितले. अजित पवार यांनी आज पुण्यातील विविध विकासकामांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
मराठा आरक्षणाविषयी भूमिका कधी स्पष्ट करणार?
मराठा आरक्षणाविषयी भूमिका कधी स्पष्ट करणार?
advertisement

पक्षाच्या शिबिरात सविस्तर भूमिका मांडणार : अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची आरक्षणाविषयीची भूमिका पक्षाच्या तीस आणि एक तारखेला होणाऱ्या कर्जत येथील अधिवेशनात स्पष्ट करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पक्षाचं 30 आणि एक तारखेला कर्जत येथे अधिवेशन शिबीर होत आहे. त्यामध्ये मी माझी आरक्षणाविषयी भूमिका मांडेल असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ओबीसी नेते छगन भुजबळांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, अजित पवारांनी उत्तर देताना म्हटले की समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य कोणीच करू नयेत. मात्र, छगन भुजबळ यांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? याबाबत त्यांनी कोणतेही थेट वक्तव्य केलं नाही.

advertisement

ललित पाटीलच्या प्रश्नावर जोडले हात

ड्रग्ज तस्करी करणाऱ्या लोकांना फाशीची शिक्षा द्यायला हवी असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्याच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी आज ससूनच्या हेरिटेज बिल्डिंगचीही पाहणी केली. ससून मधील ऐतिहासिक वार्ड क्रमांक 26 या ऐतिहासिक वास्तूला आज अजित पवार यांनी पाहणी केली. माध्यमाने त्यांच्याशी ललित पाटील विषयी प्रश्न विचारतात अजित पवार यांनी हात जोडत प्रश्नाला बगल दिली.

advertisement

वाचा - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य, OBC नेत्याने सांगितला फॉर्म्युला

पाणी प्रश्नावर सामोपचाराने मार्ग काढण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. मराठवाड्यातील पाणी प्रश्न त्याचबरोबर कोयनेचे पाणी सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात यावे या मागणीवर अजित पवार यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pawar : मराठा आरक्षणाविषयी भूमिका कधी स्पष्ट करणार? अजितदादांनी सांगितलं तारीख अन् ठिकाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल