आज शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे खेड तालुक्यात महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी कोल्हे यांनी हा खुलासा करताच उपस्थित कार्यकर्तेही अवाक झाले. शरद पवार यांना सोडून गेलेल्या आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते यांच्यावर हा निशाणा होता का? याचीच चर्चा सुरू झाली. मतदारसंघात कोल्हे फिरत नसल्याचा गोप्यस्पोट करताच कोल्हे यांचा बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे होता होता? याचीच मोठी चर्चा सुरू झाली आहे. कोल्हे आपल्या भाषणात म्हणाले की पूर्वी मतदार संघात अनेक टोल होते. अनेक टोल आता नाहीसे झालेत. त्यामुळे आता मतदार संघातील तुमचे विषय यापुढे नक्की सुटतील. हा विषय मतदार संघात माहीत असणे गरजेचे आहे, असंही खासदार अमोल कोल्हे पुढे म्हणाले.
advertisement
वाचा - Big Breaking : महुआ मोइत्रा यांच्या अडचणीत वाढ, खासदारकीही रद्द
मतदारसंघात वाढत्या बिबट्यांची गंभीर दखल
जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातील बिबट्यांची संख्या वाढत असून याचा धोका मानवी वस्तीला होत आहे. जनावरेच नाही तर शेतकऱ्यांवर अनेकदा हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी केद्रीय वने आणि पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली होती. बिबट्यांची वाढती संख्या आणि हल्ले रोखण्यासाठी बिबट प्रजनन नियंत्रण करावे. तसेच या चारही तालुक्यात दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करावा, अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या या मागणीला प्रतिसाद देत या संदर्भात तातडीने बैठक बोलावण्याचे निर्देश केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव आणि वनविभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल यांनी दिले आहेत. अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.