हसत-खेळत गेला जेवायला, पण परतलाच नाही
येमेका क्रिस्टीएन (वय 40) असे मृत तरुणाचे नाव असून तो सध्या फुरसुंगी येथे वास्तव्यास होता.मात्र तो मूळचा नायजेरियाचा होता. या प्रकरणात नायेमेका मदुबची ओनिओ आणि किन्सली ओबा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही माहिती काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली.
advertisement
पोलिसांच्या माहितीनुसार,पिसोळीतील बालाजी पद्मावतीनगर भागात राहणाऱ्या एका नायजेरियन महिलेने सोमवारी (12 जानेवारी) काही मित्रांना जेवणासाठी घरी बोलावले होते. जेवणासाठी येमेका क्रिस्टीएन, किन्सली, ओबी, ओजे ओजगवा आणि नायेमेका मदुबची ओनिया हे तिच्या घरी गेले होते.
दरम्यान, प्रेमप्रकरणाच्या कारणावरून येमेका क्रिस्टीएन याचा नायेमेका मदुबची ओनिया, किन्सली, ओबी आणि ओजे ओजगवा यांच्याशी वाद झाला. हा वाद वाढत जाऊन मारहाणीत बदलला. चौघांनी मिळून क्रिस्टीएनला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला.
जखमी अवस्थेत त्याचा मित्र गिफ्ट सिव्होनस ऊटाह याने क्रिस्टीएनला वानवडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास काळेपडळ पोलीस करत आहेत.
