पुणे : नुकतीच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. या ऑलिम्पिक स्पर्धेत मनु भाकर, नीरज चोप्रा आणि इतर काही खेळाडूंनी देशाला पदक मिळवून देत देशाचा मान वाढवला. यातून प्रेरणा घेऊन पुण्यातील काही कलाकारांनी मिळवून रांगोळीच्या माध्यमातून या खेळाडूंना मानवदंना देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. पुण्यातील विमान नगर परिसरात ऐरोमॉल याठिकाणी ही रांगोळी काढण्यात आली. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
नुकतीच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत देशाला पदके जिंकून दिली. यामुळे देशाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. उद्या आपण सर्वजण 78 वा भारतीय स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने रांगोळीच्या माध्यमातून खेळाडूंचे कौतुक करण्याचा प्रयत्न करत पुण्यातील 6 कलाकार युवकांनी एकत्र येत 20 ×15 फूट च्या आकारामध्ये ही रांगोळी काढली आहे. ही रांगोळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ही रांगोळी साकरण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागला. तर 40 किलो रांगोळी याठिकाणी वापरण्यात आली आहे.
या रांगोळीमध्ये नीरज चोप्रा, मनु भाकर, सरबजीत सिंघ, स्वप्नील कुसाळे तसेच हॉकी टीमचे प्रतिनिधित्व करणारे आणि भारताला सतरा वर्षानंतर T- 20 मध्ये वर्ल्डकप मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या खेळाडूंची प्रतिमा साकारण्यात आली आहे. आर्ट भाग्यश्री या कलाकारांच्या टीमच्या माध्यमातून ही रांगोळी काढण्यात आली आहे. यामध्ये भाग्यश्री देशपांडे, महेंद्र मेटकरी, मयूर दुधाळ, सिद्धी आंबेकर, मनाली गायकवाड, अभिषेक शिंदे यांचा समावेश आहे.
खिल्लार गायींच्या गोमुत्रातून लाखोंची उलाढाल, सोलापुरातील भाऊ-बहिणीची कमाल!
काय होता यामागचा उद्देश -
आपण नेहमी काढतो त्या रांगोळ्या आपण बघतो. मात्र, त्याचप्रमाणे हा पोट्रेट प्रकार सर्वांना माहिती व्हावा, या उद्देशाने ही रांगोळी काढण्यात आली. ही रांगोळी 20 ऑगस्टपर्यंत पाहता येणार आहे, अशी माहिती महेंद्र मेटकरी यांनी दिली.