घटनेबाबत अधिक माहिती अशी की पुण्यात दोन गटात तुफान राडा झाला आहे. टोळक्याकडून झालेल्या मारहाणीमध्ये तडीपार गुंड आजीम शेख याची हत्या झाली आहे. पुण्यातील वानवडी परिसरातील ही घटना आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुण्यात दहशत माजवणाऱ्या टोळक्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
चार दिवसांपूर्वी तरुणाची हत्या
advertisement
दरम्यान चार दिवसांपूर्वी पुण्यातून अशीच एक घटना समोर आली होती. पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंगला टॉकीज समोर टोळक्याकडून तरुणाची हत्या करण्यात आली. नितीन मोहन म्हस्के असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडली. मंगला टॉकीजला नितीन चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी टोळक्याने त्यात्यावर हल्ला करून त्याची हत्या केली.
नितीन म्हस्केवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने खुनाचा प्रयत्न केला होता. त्याच प्रकरणात झालेल्या वादातून त्यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पुण्यात गेल्या चार दिवसांत अशा पद्धतीनं दोन खूनाच्या घटना घडल्यानं शहरात खळबळ उडाली आहे.
