TRENDING:

Pune News : अरे वा! आता शासकीय कामे करा घरबसल्या; PMRDAच्या सेवा नागरिकांसाठी ऑनलाईन सुरू

Last Updated:

PMRDA Online services : पीएमआरडीएने नागरिकांसाठी सेवा सुविधा अधिक सुलभ करण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. आता नागरिकांना विविध अर्ज, मंजुरी, प्रमाणपत्रे आणि माहिती घरबसल्या ऑनलाईन मिळू शकणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील नागरिकांसाठी सरकारी सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने मोठा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकांना आता 19 सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा घेण्यासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही आणि ते घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून सेवांचा लाभ घेऊ शकतील.
News18
News18
advertisement

या नवीन ऑनलाईन सेवांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून आठवड्याभरात 10 नवीन सेवांची भर पडणार आहे. यामुळे नागरिकांना पीएमआरडीए अंतर्गत एकूण 29 सेवा ऑनलाईन घेता येणार आहेत. या उपक्रमामुळे नागरी सुविधा पारदर्शक, गतिमान आणि निश्चित कालमर्यादेत मिळतील अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केलेली आहे.

PMRDA महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या सुविधा घेण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा लाभ घ्या. अर्जदार नागरिका नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाची प्राप्तीची पुष्टी आणि अर्जाची स्थिती याबाबत माहिती मिळेल. यामुळे नागरिकांना कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. तसेच अर्ज कुठल्या अधिकाऱ्याच्या टेबलवर आहे आणि त्यावर कार्यवाही कधी होईल, याची माहितीही ऑनलाईन मिळेल.

advertisement

पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या ऑनलाईन प्रणालीतील सेवा तीन प्रमुख विभागांतर्गत उपलब्ध आहेत:

1. विकास परवानगी विभाग

अभिन्यास/इमारत बांधकाम परवानगी

जोता मोजणी प्रमाणपत्र

भोगवटा प्रमाणपत्र

झोन दाखला

भाग नकाशा/नकाशा देणे

सुधारित बांधकाम परवानगी

तात्पुरते रेखांकन परवानगी

सुधारित तात्पुरते रेखांकन

अंतिम रेखांकन परवानगी

नूतनीकरण परवानगी

भागश: भोगवटा प्रमाणपत्र

साईट एलेवेशन प्रमाणपत्र

advertisement

2. जमीन आणि मालमत्ता विभाग

वाटप भूखंडाचे / गृहयोजनेतील सदनिकांचे हस्तांतरण

वाटप भूखंडावर / गृहयोजनेतील सदनिकांवर वारसानोंद

वाटप भूखंडावर / गृहयोजनेतील सदनिकांवर कर्जासाठी ना-हरकत प्रमाणपत्र

3. अग्निशमन विभाग

प्राथमिक अग्निशमन ना-हरकत दाखला

अंतिम अग्निशमन ना-हरकत दाखला

पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्र

अग्निशमन बंदोबस्त

या ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी Aaple Sarkar आणि PMRDA अधिकृत संकेतस्थळ

advertisement

या संकेतस्थळांवर अर्ज करणे अपेक्षित आहे. ऑनलाईन अर्ज करताना काही अडचणी आल्यास संबंधित विभागाकडून मार्गदर्शन देखील मिळेल.

या सेवांमुळे नागरिकांना वेळ वाचवता येणार असून सरकारी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनतील. पुणेकरांसाठी ही ऑनलाईन सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे कारण यामध्ये विविध प्रकारच्या परवानग्या, प्रमाणपत्रे आणि अन्य नागरिक सुविधा मिळवता येतात. भविष्यात या योजनेअंतर्गत आणखी सेवांचा समावेश करण्याचा प्रशासनाचा मानस आहे, ज्यामुळे पुण्यातील नागरिकांना अधिक सोयीस्कर शासकीय सेवा मिळतील.

advertisement

पीएमआरडीएच्या ऑनलाईन सेवांचा उपक्रम नागरिकांसाठी नविन सोयीची सुरूवात आहे. यामुळे नागरी सुविधा अधिक जलद, पारदर्शक आणि घरबसल्या मिळण्यास सक्षम झाल्या आहेत. नागरिकांनी या प्रणालीचा लाभ घेऊन सरकारी सेवा मिळवणे हे आता सोपे आणि सुलभ झाले आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune News : अरे वा! आता शासकीय कामे करा घरबसल्या; PMRDAच्या सेवा नागरिकांसाठी ऑनलाईन सुरू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल