दरम्यान आज मराठा व मराठा-कुणबी आरक्षणाबाबत पुण्यात सकल मराठा समाजाकडून महत्वपूर्ण परीषदेच आयोजन करण्यात आलं आहे. परीषदेला अनेक ज्येष्ठ विधिज्ञ, संख्या शास्त्रज्ञ, समाज शास्त्रज्ञ, अर्थ शास्त्रज्ञ व इतिहास तज्ज्ञ आणि आरक्षण अभ्यासकांनी हजेरी लावली आहे. मराठा आरक्षणाची वस्तुस्थिती, कायदेशीर अडचणी व उपाययोजना अशा विविध मुद्द्यांवर या परिषदेमध्ये चर्चा सुरू आहे.
advertisement
कुणबी समाजाचा विरोध
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केलं आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्याकडून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला 40 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे या मागणीला कुणबी आणि ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होत आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशी मागणी समाजातील विविध संघटनांकडू करण्यात आली आहे. यासाठी नागपुरात आंदोलन सुरू आहे.