नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अभियंता रस्ते सपाटीकरणाच्या कामाची पाहणी करत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, रस्ते कामाच्या ठिकाणी रोलर सुरू असताना सहाय्यक अभियंता रोलरच्या अगदी मागे उभा होता. त्याचं पूर्ण लक्ष आपल्या मोबाईल फोनमध्ये होतं. त्याचवेळी चालकाने रोलर 'रिव्हर्स' घेतला. मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे अभियंत्याला रोलर मागे येत असल्याचे लक्षात आले नाही.
advertisement
रोलरखाली चिरडून मृत्यू: क्षणार्धात रोड रोलरचे मोठे चाक अभियंत्याच्या अंगावरून गेले. यामध्ये ते चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. कामाच्या ठिकाणी किंवा इतर काही कामात असताना मोबाईलचा अतिवापर कशा प्रकारे जीवावर बेतू शकतो, याचे हे भयाण वास्तव समोर आले आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, सार्वजनिक कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, या भयानक अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
