या पोलिसांवर झाली कारवाई: निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस हवालदार संजय केळकर, सागर बाविस्कर, जगन्नाथ शिंदे, प्रतिभा गावडे आणि संतोष जाधव यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी पोलीस मुख्यालयात नेमणुकीस होते, मात्र मागील काही महिन्यांपासून ते कर्तव्यावर हजर नव्हते.
निवडणूक बंदोबस्ताचा ताण: पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी (१५ जानेवारी) मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यापूर्वी तळेगाव, आळंदी आणि चाकण नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. सध्या राजकीय नेत्यांचे दौरे आणि संवेदनशील मतदान केंद्र यामुळे पोलीस दलावर कामाचा प्रचंड ताण आहे. अशा परिस्थितीत मनुष्यबळाची कमतरता असताना कर्मचारी विनापरवाना गैरहजर राहिल्याने शिस्तभंगाची ही कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
इतर ६ पोलिसांनाही दिला इशारा: मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस प्रशासनाने सातत्याने गैरहजर राहणाऱ्या एकूण ११ कर्मचाऱ्यांना हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी ५ कर्मचारी कामावर परतले, परंतु उर्वरित सहा जणांनी प्रशासनाच्या आदेशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे, आता या सहा पोलिसांवरही लवकरच निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता पोलीस आयुक्तालयाकडून वर्तवण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संकेत या कारवाईतून पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
