हिवाळ्यात दिवस लवकर संपत असल्याने सायंकाळी अंधार पडतो. शाळा सुटल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना घरी पोहोचेपर्यंत अंधाराचा सामना करावा लागतो. यामुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण होत होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत ये-जा करता येणार असून पालकांनाही दिलासा मिळणार आहे.
advertisement
Weather Alret : महाराष्ट्र आता बर्फासारखा गार होणार, हवामान खात्याचा अलर्ट
असे असेल नवे वेळापत्रक
महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी नवीन वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत शाळा सकाळी नऊ वाजता सुरू होऊन दुपारी तीन वाजेपर्यंत चालतील. तसेच शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत शाळा भरवण्यात येणार आहेत. या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना पुरेसा अभ्यासाचा वेळ मिळणार असून त्यांच्यावरचा ताणही कमी होणार आहे.
शिक्षक मुख्याध्यापकांना हजेरी बंधनकारक
शाळांच्या वेळेत बदल झाल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी देखील नव्या वेळापत्रकानुसार शाळेत वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची शिथिलता किंवा गैरहजेरी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शैक्षणिक कामकाजात शिस्त आणि नियमितता राखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.






