TRENDING:

PM Modi At 75: पुण्यात पहिल्यांदाच! पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, 1000 ड्रोनचा खास शो! किती वाजता?

Last Updated:

PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढिदवसानिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल 1000 ड्रोन आकाशात झेपावणार असून अनोख्या ‘थ्रीडी ड्रोन शो’चे आयोजन करण्यात आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस संपूर्ण देशात उत्साहाने साजरा होत आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा काळ ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा होत असून, या काळात विविध सामाजिक आणि विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाराणसी आणि अयोध्यानंतर पुण्यात अनोख्या पद्धतीने थ्रीडी ड्रोन शो आयोजित केला जात आहे. या शोद्वारे पुणेकरांना एक आगळावेगळा अनुभव मिळणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती दिली.
advertisement

या शोमध्ये तब्बल 1000 ड्रोनचा वापर करण्यात येणार असून, आकाशात विविध आकर्षक आकृत्या आणि ॲनिमेशन साकारले जातील. एकूण 23 ॲनिमेशनद्वारे मोदींच्या 11 वर्षांच्या कार्यकिर्दीचा आढावा तसेच ‘विकसित भारत 2027’ या संकल्पनेवर आधारित विविध दृश्ये दाखवली जाणार आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमातून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अनोख्या शैलीत देण्यात येतील. हा 40 मिनिटांचा शो असणार असून, 5 किलोमीटरच्या अंतरावरूनही तो स्पष्ट दिसणार आहे. मात्र, मैदानात प्रत्यक्ष उपस्थित राहून जवळपास 25 हजार नागरिकांना हा शो अनुभवता येणार आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये या कार्यक्रमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

advertisement

Business Idea: केक, बिस्किटं आणि मसाले बनवून व्हा उद्योजक, दिव्यांगांसाठी पुण्यात खास कार्यशाळा!

75 हजार विद्यार्थी पाठवणार पत्र

याचबरोबर, शहरातील 75 हजार विद्यार्थी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा पत्रके पाठवून आपला सहभाग नोंदवणार आहेत. सामाजिक उपक्रमांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने गायक अवधूत गुप्ते हे मराठी आणि हिंदी देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता सादर करणार असून, त्यानंतर रात्री 8 वाजता एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर हा बहुप्रतिक्षित ड्रोन शो होणार आहे.

advertisement

ड्रोन शोचे वैशिष्ट्य

या ड्रोन शोचे वैशिष्ट्य म्हणजे ड्रोनच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेली कामे आणि विविध योजनांचे दर्शन घडवले जाणार आहे. ‘डिजिटल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’, ‘स्वच्छ भारत’, ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारख्या मोहिमांची झलकही ड्रोन शोमध्ये उमटेल.

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, “वाराणसी आणि अयोध्यानंतर तिसरा थ्रीडी ड्रोन शो पुण्यात होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. हा शो केवळ मनोरंजनापुरता नसून त्यामध्ये प्रेरणादायी संदेशही आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देश ज्या वेगाने प्रगती करीत आहे त्याचे दर्शन नागरिकांना आकाशातून होईल. मोदींचा वाढदिवस म्हणजे फक्त उत्सव नव्हे तर सेवा आणि समाजकार्यातून योगदान देण्याची प्रेरणा, या हेतूने पुण्यातील विविध भागांमध्ये रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे आणि वृक्षारोपण कार्यक्रमही होत आहेत.”

advertisement

पंतप्रधानांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यातील हा थ्रीडी ड्रोन शो निश्चितच इतिहासात नोंद होईल. तंत्रज्ञान आणि संस्कृती यांचा अनोखा संगम पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार असून, हा कार्यक्रम शहराच्या अभिमानात भर घालणारा ठरणार आहे.

मराठी बातम्या/पुणे/
PM Modi At 75: पुण्यात पहिल्यांदाच! पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, 1000 ड्रोनचा खास शो! किती वाजता?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल