पुण्यातील 18 हजार 694 नागरिकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला आहे. पुण्यात या योजनेतून 90.62 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. यामुळे अनेक कुटुंबांची वीजबिल भरण्याची चिंता मिटली आहे. आत्तापर्यंत 31649 घरगुती ग्राहकांनी या योजनेसाठी नावनोंदणी केली आहे. यापैकी 18 हजार 694 घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले आहेत. तर 7 हजार 397 घरांवरील काम शेवटच्या टप्प्यात आहे.
advertisement
अनुदानाचे स्वरूप कसे आहे?
ज्या ग्राहकांचा महिन्याचा वीजवापर 300 युनि च्या जवळपास आहे, त्यांच्यासाठी 3 किलोवाट क्षमता असलेला सूर्यघर प्रकल्प आहे. यामधून जवळपास 300 ते 360 युनिट वीज महिन्याला तयार होते. पहिल्या दोन किलो वॅटपर्यंत प्रति किलोवॅट 30 हजार तर तीन किलो वॅट प्रकल्पाला 78 हजाराचे अनुदान केंद्र सरकारकडून ग्राहकांना मिळते.
पुणेकरांना अनुदान किती मिळाले?
पुणे महावितरण परिमंडळात गणेशखिंड मंडळात 7 हजार 312, पुणे ग्रामीण 5146 व रस्तापेठ मंडलात 6236 प्रकल्प कार्यरत झाले आहेत. गणेशखिंड मंडलात 62.4 कोटी, पुणे ग्रामीण 36.4 कोटी आणि रास्तापेठ 52.58 कोटी असे एकूण 151 कोटींचे अनुदान पुणे मंडलात आत्तापर्यंत मिळाले आहे.