advertisement

पुणे हादरलं! रमजानच्या महिन्यात मित्रानेच काढला मित्राचा काटा, कॅम्पमध्ये भररस्त्यात तरुणाची हत्या

Last Updated:

फैसलच्या छातीत, पाठीत, हातावर आणि डोक्यात गंभीर जखमा झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यात पडला.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शुल्लक थट्टा-मस्करीचे रूपांतर थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात एका तरुणाची त्याच्याच मित्रांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. फैसल फारुख खान असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत फैसल खान आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. काल कॅम्प परिसरात हे सर्व मित्र एकत्र असताना फैसलने आरोपी शहबाज शेख याची थट्टा-मस्करी केली. मात्र, ही मस्करी शहबाजच्या जिव्हारी लागली. रागाच्या भरात शहबाजने फैसलच्या कानाखाली चापट मारली. या छोट्याशा वादाचे रूपांतर काही वेळातच मोठ्या भांडणात झाले. चिडलेल्या शहबाजने आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेतले आणि फैसलवर हल्ला चढवला.
advertisement

भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ

आरोपींनी पूर्ववैमनस्यातून किंवा रागाच्या भरात फैसलला गाठले आणि त्याच्यावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. फैसलच्या छातीत, पाठीत, हातावर आणि डोक्यात गंभीर जखमा झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे  आरोपींच्या मुसक्या आवळल्या 

घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणात बजाद अली सय्यद, अली अब्बास अश्रफअली सय्यद, सोहेल युसुफ तांबोली आणि शाहबाज चांद शेख या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर तालिब अली सय्यद आणि अश्रफली सय्यद यांचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून  थट्टा-मस्करीचा असा भयानक अंत झाल्याने कॅम्प परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement

 पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे शहरातील वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. भररस्त्यात हत्या झाल्याने पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पुणे शहरातील गुंडगिरी मोडून नेमकं काढणार कोण? पोलीस यंत्रणा आपली जबाबदारी चोखपणे पार पाडणार का? या प्रश्नांनी पुणेकर सध्या चिंतेत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! रमजानच्या महिन्यात मित्रानेच काढला मित्राचा काटा, कॅम्पमध्ये भररस्त्यात तरुणाची हत्या
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement