TRENDING:

Pune News: पुणेकरांचा वेळ वाचणार! PMP आणि मेट्रो तिकिटाबाबत मोठा निर्णय, कसा होणार फायदा?

Last Updated:

Pune News: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पीएमपी बस आणि मेट्रो प्रवाशांना फायदा होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत लवकरच मोठा बदल घडणार आहे. पीएमपीएमएल (PMPML) आणि पुणे मेट्रोच्या प्रवाशांना आता वेगवेगळ्या अॅप्सचा वापर करण्याची गरज राहणार नाही. कारण, दोन्ही संस्थांनी एकात्मिक तिकीट प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच या सेवेला सुरुवात होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना एका मोबाईल अॅपवरूनच पीएमपी आणि मेट्रोचे तिकीट खरेदी करता येणार आहे.
Pune News: पुणेकरांचा वेळ वाचणार! PMP आणि मेट्रो तिकिटाबाबत मोठा निर्णय, कसा होणार फायदा?
Pune News: पुणेकरांचा वेळ वाचणार! PMP आणि मेट्रो तिकिटाबाबत मोठा निर्णय, कसा होणार फायदा?
advertisement

नुकत्याच झालेल्या बैठकीत पीएमपीएमएल प्रशासन आणि मेट्रो प्रशासन यांच्यात तिकीट प्रणाली एकमेकांच्या सॉफ्टवेअरशी जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या एपीआय हस्तांतरणावर सहमती झाली आहे. पुढील आठवड्यात दोन्ही संस्थांच्या तांत्रिक विभागांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, या बैठकीत सेवा कधीपासून सुरू करायची, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

समृद्धी महामार्ग अन् अटल सेतूवर 100 टक्के टोलमाफी, कुणाला होणार फायदा? पाहा सविस्तर

advertisement

गेल्या काही महिन्यांपासून या उपक्रमाबाबत चर्चा सुरू होती, मात्र प्रगती संथ होती. पीएमपीएमएलचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी पुन्हा हा मुद्दा पुढे आणल्याने निर्णयाला गती मिळाली आहे. एकात्मिक तिकीट प्रणाली लवकरच लागू होईल. यामुळे प्रवाशांची वेळ वाचेल आणि तिकीट खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ होईल,असे देवरे यांनी स्पष्ट केले.

सध्या ‘आपली पीएमपीएमएल’ अॅपचा वापर जवळपास 10 लाख प्रवासी करतात, तर मेट्रो अॅपचे एक लाखांहून अधिक वापरकर्ते आहेत. आता या दोन अॅप्सची तांत्रिक माहिती, प्रवाशांचे खाते, तसेच तिकीट व्यवहाराची माहिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एकमेकांना हस्तांतरित केली जाणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यास, पुण्यातील सार्वजनिक वाहतूक प्रणाली अधिक एकात्मिक आणि कार्यक्षम बनेल. प्रवाशांना दोन वेगळ्या अॅप्सवर न जाता, एका अॅपद्वारे सोयीस्कर प्रवासाचे नियोजन करता येईल. तसेच डिजिटल पेमेंट्सद्वारे व्यवहार सुलभ होतील.

advertisement

या एकात्मिक तिकीट प्रणालीमुळे शहरातील बस आणि मेट्रो प्रवासात समन्वय वाढेल, तसेच प्रवाशांचा अनुभव सुधारेल. तांत्रिक बाबींवर चर्चा करून लवकरच याची अंमलबजावणी होणार असून, पुणेकरांसाठी ही नवी सुविधा खऱ्या अर्थाने सार्वजनिक वाहतूक अधिक आधुनिक आणि सोयीस्कर करणारी ठरेल.

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांचा वेळ वाचणार! PMP आणि मेट्रो तिकिटाबाबत मोठा निर्णय, कसा होणार फायदा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल