TRENDING:

पटापट बस खाली करा! पिंपरीत धावत्या पीएमपीएमएल बसला अचानक आग, प्रवाशांची धावपळ

Last Updated:

पीएमपीएलच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी एकाच दिवसात पीएमपीएमएलच्या (PMPML) दोन बसला आग लागल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे पीएमपीएलच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
News18
News18
advertisement

बस चालकाच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. बसने पेट घेतल्यानंतर चालकाने लगेच बस थांबवली आणि सर्व प्रवासी खाली उतरले. मात्र, तोवर बसले मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. अखेर अग्निशमन विभाग वेळीच दाखल झाल्याने बसच्या आगीला आटोक्यात आणायला यश आलं. बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून चालक व वाहकाने प्रवाशांना बाहेर पडायला सांगितले. सर्व प्रवाशी सुखरुप बाहेर पडल्याने अनर्थ टळला.

advertisement

पहिली घटना: ठिकाण पिंपरी

सकाळच्या सुमारास पिंपरीमध्ये एका बसने अचानक पेट घेतला. बसमध्ये सुमारे १५ प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. चालकाला इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच त्याने तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, पण बसचे मोठे नुकसान झाले.

advertisement

दुसरी घटना: ठिकाण काळेवाडी

दिवसभरातील दुसरी घटना सायंकाळी काळेवाडी येथे घडली. ही बस मेंटेनन्ससाठी शिवाजीनगर येथून निगडीकडे नेत असतानाच तिने अचानक पेट घेतला. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पीएमपीएमएलच्या बस खरंच सुरक्षित आहेत का?

दरम्यान एकाच दिवशी दोन बस पेटल्यामुळ पीएमपीएमएलच्या बस खरंच सुरक्षित आहेत का? असा गंभीर प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पीएमपीएमएलच्या तातडीच्या देखभालीवर आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बसमधील सर्व प्रवाशी सुखरुप असून, कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दागिने नाही तर... पुणेकर या लाख मोलाच्या वस्तू मोफत पाहता येणार, कधी आणि कुठं?
सर्व पहा

नागपूर - उमरेड रोडवर धावत्या ट्रॅव्हल्सला आग,काही मिनिटात बस जळून खाक; काळजाचा ठोका चुकवणारे फोटो

मराठी बातम्या/पुणे/
पटापट बस खाली करा! पिंपरीत धावत्या पीएमपीएमएल बसला अचानक आग, प्रवाशांची धावपळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल