पुण्यातील कुख्यात गँग असलेल्या आंदेकर आणि कोमकर कुटुंबातला फॅमिली वॉर संपायचा नाव घेत नाहीये. वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून १९ वर्षीय आयुष कोमकरची गणेशोत्सवाच्या काळात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात बंडू आंदेकर हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांच्या तावडीत असतानाही बंडू आंदेकरच्या नावावर जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
advertisement
त्यानंतर पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा मारला. एका लाँड्रीच्या दुकानात हा प्रकार सुरू होता. या ठिकाणीहून मोबाईल फोन आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर सहकुटुंबाच्या बँक अकाउंट सील करून आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. यातील आरोपी सुटण्यासाठी कुठलाही आर्थिक व्यवहार करता येऊ नये यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. बंडू आंदेकर, वनराज आंदेकर आणि त्यांच्या पत्नीचे काही बँक अकाउंट आहेत तसंच काही लॉकर हे सुद्धा सील करण्यात आले आहेत. तसंच, आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर आणि त्यांचे कुटुंबीयांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.