TRENDING:

दगडूशेठ गणपती भक्तांसाठी पर्वणी, 42 व्या वर्धापन दिनी खास कार्यक्रमांची मेजवाणी, पाहा सविस्तर

Last Updated:

Dagdusheth Ganpati: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिराचा 42 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी विविध धार्मिक आणि सांगितीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या 42 व्या वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्यासाठी गुढीपाडव्यापासून म्हणजेच दि. 19 ते 23 मार्चपर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.
दगडूशेठ गणपती भक्तांसाठी पर्वणी, 42 व्या वर्धापन दिनी खास कार्यक्रमांची मेजवाणी, पाहा सविस्तर
दगडूशेठ गणपती भक्तांसाठी पर्वणी, 42 व्या वर्धापन दिनी खास कार्यक्रमांची मेजवाणी, पाहा सविस्तर
advertisement

हिंदू नववर्षारंभ मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला म्हणजेच 19 मार्च रोजी सायंकाळी 4.45 वाजता गणेशपूजनाने महोत्सवास प्रारंभ होईल. भाविकांसाठी नूतन मराठी विद्यालय मराठी शाळा येथेच वाहने पार्किंगची व्यवस्था केली आहे. संगीत महोत्सव विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे. त्यामुळे पुणेकरांनी मोठ्या संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

स्वामीभक्तांसाठी सुवर्णयोग; पुण्यात पहिल्यांदाच श्री स्वामी समर्थांच्या सूर्यमणी, पादुकांचे दर्शन, कधी आणि कुठं?

advertisement

असे असतील कार्यक्रम

गुरुवार, 19 मार्च रोजी उद्घाटन कार्यक्रम होईल. त्यानंतर सायं. 5 वाजता पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा आणि तारपा पथकाचे तारपा वादन आणि नृत्य होईल. सायंकाळी 7 वाजता ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके आणि सहकारी यांचा ‘फिटे अंधाराचे जाळे’ हा कार्यक्रम असेल.

शुक्रवार, दि. 20 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता पं. उपेंद्र भट आणि सहकाऱ्यांचा गुरू गणेश हा सांगीतिक कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता नंदेश उमप आणि  75 कलाकारांचे सादरीकरण असलेला ‘मी मराठी’ कार्यक्रम होईल.

advertisement

शनिवार, दि. 21 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता खंडेराव मुळे आणि सहकाऱ्यांचा स्वरयात्रा कार्यक्रम असेल. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता कुणाल गांजावाला लाईव्ह इन कॉन्सर्ट असेल.

रविवारी, दि. 22 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता नटरंग ॲकॅडमीतर्फे त्रिपुंड कार्यक्रम असेल. तर सायंकाळी 7 वाजता माणिक वर्मा फाउंडेशननिर्मित अमृताहुनी गोड कार्यक्रम असेल. यामध्ये राणी वर्मा, वंदना गुप्ते, भारती आचरेकर, शैला दातार, सावनी दातार, निलाक्षी पेंढारकर, दीपिका जोग, हृदया दातार हे सादरकर्ते कलाकार असतील.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रस्त्यावरचं ‘ते’ पोस्टर पाहिलं, लेकासाठी आईनं मंगळसूत्र विकलं; मराठमोळा विक्रम भारताचा फिटनेस ब्रँड अम्बॅसिडर, Video
सर्व पहा

सोमवार, दि. 23 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता पं. मिलिंद रायकर, यज्ञेश रायकर यांची व्हायोलिन जुगलबंदी असेल. तर सायंकाळी 7 वाजता पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा भावसरगम यांची स्वरमैफल असेल.

मराठी बातम्या/पुणे/
दगडूशेठ गणपती भक्तांसाठी पर्वणी, 42 व्या वर्धापन दिनी खास कार्यक्रमांची मेजवाणी, पाहा सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल