TRENDING:

Pune Accident News: भयानक अपघात, दुचाकीस्वाराचं डोकं थेट ग्रीलमध्ये अडकलं; पुण्यातला VIDEO

Last Updated:

Pune Pimpri Chinchwad Accident News: पिंपरी चिंचवड शहरातील वाकड भागातील बीआरटी लेनमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या बाईकस्वाराचा विचित्र पद्धतीने अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जीव वाचला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी चिंचवड शहरातून एक बातमी समोर येत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड भागातील बीआरटी लेनमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या बाईकस्वाराचा विचित्र पद्धतीने अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जीव वाचला आहे. पण, त्याने हेल्मेट न घातल्यामुळे त्याचं डोकं थेट बीआरटी बस स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकले आहे. सध्या ह्या अपघाताची सोशल मीडियावरच नाही तर, पुण्यामध्येही जोरदार चर्चा होताना दिसत आहे. नेमकी ही घटना कशी घडली जाणून घेऊया...
News18
News18
advertisement

पुण्यातील वाकड परिसरातल्या बीआरटी लेनमधून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराचे बाईकवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, बाईकस्वाराचे डोके थेट बीआरटी बस स्टँडच्या लगत असलेल्या एका लोखंडी ग्रीलमध्ये अडकले. दुचाकीस्वाराच्या अपघातात बाईक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बी आर टी लेनच्या नियमांचे उल्लंघन आणि अतिवेगामध्ये बाईक चालवल्यामुळे त्याचा अपघात झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे काही वेळेसाठी का होईना पुण्यामध्ये खळबळ उडाली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात गरम जेवणात नक्की टाका 1 चमचा तूप, शरिरासाठी आहे एक नंबर!
सर्व पहा

बी आर टी लेनमध्ये भरधाव वेगाने जात असताना बाईकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ती बाईक थेट बीआरटी बस स्टँडच्या लोखंडी ग्रीलवर आदळली. लोखंडी ग्रीलला आदळून त्या दुचाकीस्वाराचे डोके त्या ग्रीलमध्ये अडकले. या अपघातात बाईकस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने त्याचा जीव थोडक्यात बचावला आहे. प्राथमिक माहितीनुसार, बीआरटी लेनमधील नियमभंग आणि अतिवेगामुळे हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. पुणे वाहतूक पोलिस या तरूणाला काय शिक्षा देणार? अद्याप ही माहिती समोर आलेली नाही. या भीषण अपघातानंतर पुन्हा एकदा असं अधोरेखित होतंय की, गाडी चालकांनी नियंत्रित वेगाने आणि हळू गाडी चालवायला हवी.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident News: भयानक अपघात, दुचाकीस्वाराचं डोकं थेट ग्रीलमध्ये अडकलं; पुण्यातला VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल