TRENDING:

खूशखबर! पुण्यातून आता 37 शहरांची हवाई सफर, दुबई, दिल्ली अन्..., पाहा संपूर्ण यादी

Last Updated:

Pune Airport: पुणे विमानतळ प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार असून, व्यवसाय, पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुणे विमानतळ प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 मेपासून पुणे विमानतळावर नव्याने 15 स्लॉट वाढवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे पुणे विमानतळावरील एकूण स्लॉटची संख्या थेट 235 होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या वाढीमुळे पुणे विमानतळ देशातील तब्बल 37 शहरांशी थेट जोडले जाणार आहे.
खूशखबर! पुण्यातून आता 37 शहरांची हवाई सफर, दुबई, दिखूशखबर! पुण्यातून आता 37 शहरांची हवाई सफर, दुबई, दिल्ली अन्..., पाहा संपूर्ण यादील्ली अन्..., पाहा संपूर्ण यादी
खूशखबर! पुण्यातून आता 37 शहरांची हवाई सफर, दुबई, दिखूशखबर! पुण्यातून आता 37 शहरांची हवाई सफर, दुबई, दिल्ली अन्..., पाहा संपूर्ण यादील्ली अन्..., पाहा संपूर्ण यादी
advertisement

पुणे विमानतळ प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार असून, व्यवसाय, पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. तसेच पुण्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येतंय.

आयटीयन्स घरून निघण्यापूर्वी 'हे' वाचा! हिंजवडी-वाकडमध्ये ट्रॅफिक जॅमचं टेन्शन; अनेक रस्ते बंद, पाहा पर्यायी मार्ग

प्रवाशांना अधिक उड्डाणांचे पर्याय

advertisement

View More

दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, गोवा, हैदराबाद, नागपूर, जयपूर आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांसाठी पुणे विमानतळावर सर्वाधिक उड्डाणे सुरू आहेत. तसेच नांदेड, सिंधुदुर्ग, जळगाव आणि किशनगड यांसारख्या शहरांशी थेट विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळाली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर पुणे विमानतळ दुबई, बँकॉक आणि अबुधाबी या तीन महत्त्वाच्या शहरांशी थेट जोडलेला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) निर्देशानुसार 29 मार्चपासून पुणे विमानतळावर उन्हाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे.

advertisement

नवीन मार्गांसह अतिरिक्त उड्डाणे

उन्हाळी वेळापत्रकात नव्या स्लॉटची भर पडल्याने पुणे विमानतळावरील स्लॉटची संख्या 235 पर्यंत वाढणार आहे. सध्या 216 स्लॉट वापरात असून उर्वरित स्लॉट्स विमान कंपन्यांना त्यांच्या विमानांची उपलब्धता आणि नियोजनानुसार देण्यात येणार आहेत.

स्पाइसजेटकडून कोलकाता मार्गावर, अकासा एअरकडून वाराणसीसाठी तर एअर इंडिया एक्स्प्रेसकडून बेंगळुरूसाठी लवकरच अतिरिक्त उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय एअर इंडियाने बागडोरा मार्गाचा समावेश केला असून स्टार एअरकडून सोलापूर-तिरुपती आणि फ्लाय 91 कडून मंगळुरू या मार्गांवरही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चांगापूरचं प्रसिद्ध हनुमान मंदिर, ‘त्या’ विहिरीला 108 प्रदक्षिणा, पूर्ण होतात मनोकामना, Video
सर्व पहा

दरम्यान, विद्यमान मार्गांवरील उड्डाणांची संख्या वाढवण्याची प्रक्रिया सुरू असून यामुळे प्रवाशांना अधिक पर्याय आणि सुविधा मिळणार आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
खूशखबर! पुण्यातून आता 37 शहरांची हवाई सफर, दुबई, दिल्ली अन्..., पाहा संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल