अनोखा आणि लक्षवेधी सत्कार
अजित पवार यांच्या पुण्यातील भव्य रॅलीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक उपाध्यक्ष करण गायकवाड यांनी उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात अनोखा आणि लक्षवेधी सत्कार केला. क्रेनला स्वतः लटकून त्यांनी हार परिधान केला, तसेच सामाजिक समतेचे प्रतीक असलेली महात्मा फुले यांची पगडी घालण्यात आली. त्यावेळी करण गायकवाड यांचं धाडस पाहून अजित पवार देखील शॉक झाले. ओळखीचा चेहरा पाहून अजित पवारांनी देखील सेल्युट केला.
advertisement
मोफत बस आणि मेट्रो सेवेचं आश्वासन
पुण्यातील चार मतदारसंघात अजित पवार यांनी रोड शो केला. अजित पवार यांच्यासाठी पुणे महानगरपालिका निवडणूक अतितटीची झाली आहे. अजित पवार यांनी राज्यातील पुणे आणि पिपंरी चिंचवड महापालिकेत आपलं वर्चस्व रहावं यासाठी ताकद लावली आहे. अशातच आता पुण्यात अजित पवार यांनी पुणेकरांना गुड न्यूज दिली आहे. अजित पवार यांनी मोफत बस आणि मेट्रो सेवेचं आश्वासन दिलंय.
पाच मुद्द्यावरून आश्वासन
दरम्यान, पुण्यात आज अजित पवार यांनी मोठी घोषणा केली. आज मी नेता म्हणून नाही, तर पुणेकर म्हणून बोललो. कारण जिथं आपलेपणा असतो, तिथं कारणं दिली जात नाहीत. तिथं जबाबदारी घेतली जाते, असं म्हणत अजित पवार यांनी पुणेकरांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुणेकरांसाठी मोफत मेट्रो आणि बस सेवा सुरू करणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीरनामा घोषित केलाय. अजित पवार यांनी पुणेकरांना पाच मुद्द्यावरून आश्वासन दिलं.
