TRENDING:

मध्यरात्री दोनची वेळ, पुण्यात 2 भाऊ रस्त्यावर थांबलेले; खिशात होते हळदीचे पॅकेट, उघडताच पोलीसही हादरले, अटक

Last Updated:

पोलिसांनी जेव्हा त्यांच्या घराची झडती घेतली, तेव्हा पोलीसही चक्रावून गेले. घरातून आणखी १३ किलो गांजा आणि काही विदेशी चलन हस्तगत करण्यात आले आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात ड्रग्ज तस्करांनी आता पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी अजब शक्कल लढवली आहे. बाणेर परिसरात अत्यंत चलाखीने हळदीच्या पाकिटांमध्ये गांजा लपवून विक्री करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी केवळ गांजाच नाही, तर परदेशी चलनही जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या (प्रतिकात्मक फोटो)
दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकं प्रकरण काय?

बाणेर परिसरात दोन तरुण हळदीच्या पाकिटांचा वापर करून गांजाची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती बाणेर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास सापळा रचला. यावेळी दुचाकीवर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी थांबवून त्यांची झडती घेतली. सुरुवातीला त्यांच्याकडे केवळ हळदीची पाकिटे दिसली, मात्र पोलिसांनी संशयावरून ती पाकिटे फोडली असता त्यात गांजा दडवलेला असल्याचे उघड झाले.

advertisement

पुणे हादरलं! लघुशंकेसाठी थांबलेले दोघं, कबुतर चोर समजून चौघांकडून ठेचून हत्या, वानवडीत मध्यरात्री हादरवणारा थरार

पोलिसांनी अभिषेक बोरसे (वय २४) आणि अक्षय बोरसे (दोघे रा. पिंपरी-चिंचवड) यांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुरुवातीला ३ किलो गांजा मिळाला. मात्र, पोलिसांनी जेव्हा त्यांच्या घराची झडती घेतली, तेव्हा पोलीसही चक्रावून गेले. घरातून आणखी १३ किलो गांजा आणि काही विदेशी चलन हस्तगत करण्यात आले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

हे दोन्ही आरोपी पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी असून ते पुण्याच्या विविध उच्चभ्रू भागात जाऊन ग्राहकांना या 'हळद-मिश्रित' गांजाची विक्री करायचे. या गुन्ह्यात अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत आणि परदेशी चलनाचे कनेक्शन काय आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
मध्यरात्री दोनची वेळ, पुण्यात 2 भाऊ रस्त्यावर थांबलेले; खिशात होते हळदीचे पॅकेट, उघडताच पोलीसही हादरले, अटक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल