गूळ असला की मुंग्या येतात…
भारतीय जनता पार्टी हा पक्ष उभा आहे. विचारांनी आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेने नुसत्या लाभाच्या राजकारणाने नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ठाम भूमिका घेतली पाहिजे. खऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान आणि आत्मविश्वास टिकवण्यासाठी आवश्यक पावलं उचलली पाहिजेत हीच आमची आर्त हाक, असं या कार्यकर्त्याने म्हटलं आहे. गूळ असला की मुंग्या येतात… आणि आज भाजपातही तेच चित्र दिसतंय. सत्ता आहे म्हणून इन्कमिंग वाढतंय, असंही अमोल थोरात यांनी म्हटलं आहे.
advertisement
फक्त उमेदवारी मिळावी म्हणून...
कालपर्यंत भाजपाच्या आमदार खासदार मोदीजी योगीजी अनेकांना शिव्या देणारे, कार्यकर्त्यांना त्रास देणारे आज स्वतःला "कट्टर भाजप कार्यकर्ता" म्हणून दाखवण्याच्या स्पर्धेत आहेत, फक्त उमेदवारी मिळावी म्हणून... भाजपाचं तिकीट म्हणजे जिंकण्याची हमी म्हणून मुंग्या जशा वरुळातून बाहेर पडून गुळाकडे धावत येतात, तसं काहीजण पक्षात धावत येत आहेत. त्यांचं स्वागत आहे. पण उद्या त्यांना उमेदवारी न मिळाली तर हेच लोक पक्षासाठी काम करतील का? तेव्हा कळेल कोण खरा भाजपमय आहे.
सत्ता असो वा नसो पक्ष प्रथम...
दुर्दैवाने आज भाजप कार्यालयात एखादा जुना कार्यकर्ता म्हणतो, तर त्यालाच सांगितलं जातं. तु मागे बस... कित्येकांना काही किंमतच उरलेली नाही. पण सत्य हेच आहे की पक्ष उभारणारे, कठीण काळात सोबत राहणारे, सत्ता असो वा नसो पक्ष प्रथम, मी द्वितीय या तत्वावर चालणारे कार्यकर्तेच खरे आहेत आणि असे कार्यकर्ते आज फारच कमी उरले आहेत. पक्षाच्या वरिष्ठांनी हे ओळखून योग्य निर्णय घ्यावेत. कारण सत्ता बदलते. पण निष्ठा बदलू नये, असं अमोल थोरात म्हणतात.
