नेमकी घटना काय?
ही घटना १६ डिसेंबर २०१५ रोजी घडली होती. पीडित महिला आणि आरोपी यांच्या कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपी महिलेच्या घरात घुसला होता. त्यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने महिलेला शिवीगाळ केली आणि तिचा विनयभंग केला. इतकंच नव्हे, तर या वादात आरोपीच्या भावानेही पीडित विवाहितेला मारहाण केली होती. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेनं जुन्नर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.
advertisement
न्यायालयाचा निकाल: गेल्या नऊ वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरू होती. प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. विनयभंग केल्याप्रकरणी या प्रकरणातील मुख्य आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, आरोपीच्या भावाने मारहाण केल्याप्रकरणी त्याला १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि घरात घुसून दहशत माजवणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी न्यायालयाचा हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.
